Photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी ध्वजवंदना

आज संपूर्ण भारत देश ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे.याचं निमित्ताने संपूर्ण देशभरात ध्वजवंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजवंदन केले.याप्रसंगी उपस्थित पोलीस बांधवासोबत राष्ट्रध्वजाला मुख्यमंत्र्यांनी सलामी दिली.यावेळी वर्षा बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या समस्त पोलीस बांधवाना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.