जुळ्या मुलांना जन्म देण्यासाठी १९ वर्षीय तरुणी पोहोचली रुग्णालयात अन् झालं असं

19 Year Old Girl Delivers 3 Babies In Maharaja Yeshwantrao Hospital Indore
जुळ्या मुलांना जन्म देण्यासाठी १९ वर्षीय तरुणी पोहोचली रुग्णालयात अन् झालं असं

एक १९ वर्षी तरुण मुलगी आपल्या जुळ्या मुलांना जन्म देण्यासाठी रुग्णालयात पोहोचली. पण त्यावेळी तिने जुळ्यांना जन्म देण्याऐवजी तिळ्यांना जन्म दिला. मात्र दुर्दैवाने यामधील एक नवजात मुलगी आयुष्य आणि मृत्यूशी झुंज देत असल्याचं समोर आलं आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील इंदौरमध्ये घडली असून याबाबत शासकीय महाराजा यशवंतराव रुग्णालयच्या एका वरिष्ठ डॉक्टराने सोमवारी माहिती दिली.

एमवायएचचे स्त्री रोग तज्ज्ञ सुमित्रा यादव यांनी सांगितलं की, ‘गर्भवती १९ वर्षीय महिला अचानक आमच्या रुग्णालयात पोहोचली होती. तिने आम्हाला सांगितलं होते की, तिच्या गर्भात जुळी मुलं आहेत. परंतु रविवारी रात्री प्रसूती केल्यानंतर १५ मिनिटांतच तिने तीन मुलींना जन्म दिला.’

पुढे डॉक्टर यादव यांनी सांगितलं की, ‘सध्या महिलेवर आणि तिच्या मुलींवर सातत्याने डॉक्टरांचे लक्ष्य आहे.’ स्त्री रोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यामधील एका नवजात मुलीची प्रकृती जास्त गंभीर आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान माहितीनुसार, गर्भधारणेचा सर्वसामान्य कालावधीनंतर जन्मलेल्या बाळांचं वजन साधारणत: २.५ ते ३.५ किलो असतं.


हेही वाचा – टिव्ही रिपोर्टरला बंदूकीचा धाक दाखवत ऑन एअर लुटले, व्हिडिओ झाला व्हायरल