घरट्रेंडिंगहा आहे ३६ कोटींचा कुत्रा!

हा आहे ३६ कोटींचा कुत्रा!

Subscribe

अमेरिकेतील एक ८ वर्षांचा कुत्रा हा ३६ करोड रुपयांचा मालक झाला आहे. ही गोष्ट एकायला जरी विचित्र वाटत असेल तरी ही घटना खरी आहे. एका कुत्र्यासाठी, ही रक्कम त्याच्या पूर्ण वयापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. वास्तविक, अमेरिकेच्या टेनेसी येथे राहणाऱ्या बिल डोरिसने आपल्या कुत्रा (लुलू)च्या मृत्यूनंतर ‘लुलू’ साठी ३६,२९,५५,२५० रुपयांची भरभक्कम अशी संपत्ती सोडली होती. अहवालानुसार, बिल डोरिसला त्याचा 8 वर्षाचा लुलू वर खूप प्रेम होते.

मृत्यूपूर्वी बिल डोरिस यांनी त्याचे त्यांच्या कुत्र्याविषयीचे त्यांचे प्रेम व्यक्त केले आणि त्यांच्या मृत्यूनंतर ही संपत्ती ट्रस्टकडे हस्तांतरित केली जावी जेणेकरुन लुलूची अधिक काळजी घेतली जाईल,अशी शेवटची इच्छा व्यक्त केली. डेरिसने त्याची मैत्रीन मार्था बर्टन हिला लूलूच्या देखरेखीसाठी सोडले,डॉरिसच्या इच्छेनुसार लुलूच्या योग्य देखरेखीसाठी बर्टन विश्वासार्ह आहे. डोरिसच्या इच्छेनुसार, लुलूची योग्य काळजी घेण्यासाठी ट्रस्टमध्ये जमा केलेल्या पैशातून बर्टन यांना मासिक खर्च दिला जाईल.ह्या व्यतीरिक्त ‘लुलू’ ला जी मोठी रक्कम त्याच्या मालकाकडून मिळाली आहे ती त्याचा नवीन मालक  इच्छेनुसार वापरण्यास सक्षम राहणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -