Viral Video : लाकडावर बसलेल्या कबुतराला मांजर पकडणार, तेवढ्यात झालं असं काही…

सोशल मीडियामुळे आपल्याला जगभरातील अनेक गोष्टी सहज कळतात. सोशल मीडियावर वारंवार अनेक फोटो नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यांपैकी अनेक व्हिडिओंना नेटकऱ्यांकडून पसंती मिळते. सध्या सोशल मीडियावर असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक कबूतर आणि  मांजर दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाचे कबूतर एका ठिकाणी शांत बसलेले आहे. दुसरीकडून एक मांजर तिथे येते. कबूतर शांत बसलेले पाहून मांजर त्या कबूतरावर हल्ला करायच्या तयारीत कबूतराच्या दिशेने हळूहळू चालत आहे. मात्र मांजर आपल्या दिशेला येत असूनही कबूतर मात्र एका जागी निपचित उभे आहे. मांजर कबूतराच्या तोंडापर्यंत जाते आणि अचानक मागे फिरते.

खंरतर हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत खाली कॅप्शन सुद्धा दिले आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, “मांजराला कबूतरावर हल्ला करायचा आहे. पण कबूतर आंधळे आहे. मात्र जेव्हा ही गोष्ट मांजराच्या लक्षात येते. तेव्हा शिकारीचा विचार बदलते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण भावूक सुद्धा होत आहे.”
हा व्हिडिओ पाहून अनेकजण म्हणत आहेत की, “प्राणी माणुसकीने वागत आहेत आणि माणसं प्राण्यांसारखे वागत आहेत.”