घरट्रेंडिंगबाबो! व्हिस्कीची एक बॉटल विकली गेली तब्बल १० लाख डॉलर्सला

बाबो! व्हिस्कीची एक बॉटल विकली गेली तब्बल १० लाख डॉलर्सला

Subscribe

दुर्मिळ व्हिस्की संग्रहाला चक्क ६.७ दशलक्ष डॉलर्सची बोली

दारु ही अशी गोष्ट आहे ज्याच्या किंमतीकडे फार कमी जण बघतात, कारण ‘एकच शौक बडी चीज है.’ आनंद असो वा दु:ख, दारुशिवाय तो क्षण पूर्ण जगल्यासारखं मद्यपींना वाटत नाही. त्यामुळे जगभरात अनके जण दारुचे चाहते आहे. याच दारुचे शौकींग लोक दारुच्या बाटल्यांचा संग्रह करुन ठेवतात. याच दारुच्या चाहत्यांमुळे पाश्चिमात्य देशांमध्ये आजही शेकडो वर्ष जुन्या दारु निर्मित कंपन्या अस्तित्त्वात आहेत. या कंपन्यामध्ये अनेक वर्ष जुन्या लोकप्रिय दारुंचा संग्रह केला जातो. दारु जितकी जुनी तितकी तिची किंमत जास्त असे म्हंटले जाते. त्यामुळे अतिशय जुन्या दारुच्या किंमती नेहमीच्या दारुपेक्षा अनेकपटीने आजही विकल्या जातात. यासाठी दुर्मिळ दारुच्या विक्रीसाठी आज मोठ मोठ्या लिलावांचे आयोजन पाश्चिमत्य देशांमध्ये होताना आपण पाहतो. यात अनेक जुन्या दारुचे संग्रह करुन ठेवणारे शौकींग लोक सहभाग घेतात. अशाच एका जुन्या दारु बॉटल लिलावाची सध्या चर्चा होत आहे. (Whisky Collection)

ब्रिटनमध्ये शंभर वर्षापूर्वीच्या दुर्मिळ व्हिस्किच्या संग्रहाचा लिलाव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लिलावात व्हिस्किच्या जुन्या भरलेल्या बॉटला मिळालेल्या किंमतीने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केला आहे. नुकताच या व्हिस्की बॉटलचा ऑनलाइन लिलाव पार पडला. यातील व्हिस्कीच्या एका बाटलीला तब्बल दहा लाख डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांची बोली लागली. मॅकलन डिस्टीलरी कंपनीने १९२६ म्हणजे जवळपास १०० वर्षापूर्वी बनवलेली ही व्हिस्की जगातील सर्वात दुर्मिळ १४ दारुंपैकी एक आहे. त्यामुळे दुर्मिळ अशा व्हिस्कीच्या बाटलीला आत्तापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे.

- Advertisement -

३९०० सिंगल माल्टसच्या (Single Malt) संग्रहाला ६.७ दशलक्ष अशी रेकॉर्डब्रेक किंमत मिळाली आहे. यावरुन जगात दारुप्रेमी किंवा दारु शौकींग दारुसाठी कायपण करु शकतात हे सिद्ध होत आहे. या लिलावात बाल्व्हेनी 1961 व्हिंटेज कास्क (Balvenie 1961 Vintage cask ) स्कॉटलंडमधील (Scotland) अतिशय दुर्मिळ आणि आता अस्तित्वात नसलेल्या एका डीस्टीलरीमध्ये तयार झालेली ऐतिहासिक डल्लास धु 1921 प्रायव्हेट कास्क (Dallas Dhu 1921 Private Cask) ही 64 वर्षं जुनी माल्ट अशा अनेक व्हिस्कीच्या प्रकारांचा समावेश होता.  या ऑनलाइन लिलावात जगभरातील ५४ देशांमधील १५५७ शौकींग खरेदीदारांना आपला सहभाग दर्शवला. एक व्यक्तीने केलेल्या दुर्मिळ व्हिस्की बॉटल संग्रहाला ऑनलाइन लिलावात प्रथमच इतकी बोली लागली. इयान मॅक्लूनी (Iain Mc Clune) या व्हिस्की लिलावाचे संस्थापक (Founder of Whisky Auctioneer) होते. या व्हिस्की संग्रहाला मिळालेली अती प्रचंड किंमत यामुळं या लिलावानं एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. फक्त आयोजकांसाठी नाही, तर संपूर्ण व्हिस्की उद्योग क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक लिलाव ठरला आहे.


हेही वाचा- लस नको? मग coronaची गोळी खा

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -