Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE लस नको? मग खा Coronaची गोळी

लस नको? मग खा Coronaची गोळी

Related Story

- Advertisement -

भारतात कोरोना महामारीच्या विषाणूवर लस उपलब्ध झाली आहे. मात्र तरीही लोकांचा लसीसाठी हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या कोरोना पुन्हा डोक वर काढताना दिसत आहे. कोरोनाची रुग्णसंख्यी वाढत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. लसीच्या दुसऱ्या टप्प्याची ही सुरुवात झाली. १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. मात्र लसीबाबत अजूनही अनेक गैरसमज असल्याचे दिसून येत आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीऐवजी गोळ्या याव्यात असा विचार बऱ्याच जणांनी केला असेल. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे तज्ज्ञ कोरोनावरील गोळ्यांवर अभ्यास करत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोरोनाला हरवण्यासाठी औषधांच्या गोळ्याही येऊ शकतात. सध्या इंजेक्शनचा फ्री डोस तयार करण्यासाठी काम सुरु असल्याचे ऑक्सफर्ड एस्टाजेनेका लसीचे चीफ डेव्हलपर सारा गिल्बर्ट यांनी सांगितले आहे.

ऑक्सफर्डचे शास्रज्ञ सध्या अशी गोळी शोधत आहेत जी नेजल स्प्रे किंवा पोलिओ लसीकरणाच्यावेळी मुलांना ताप आल्यावर देण्यात येते. या गोळीची सध्या अमेरिकेत वैद्यकिय चाचणी सुरु आहे. गिल्बर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाला विषाणूला प्रभावी ठरणारी लस तयार करण्यासाठी आणखी बराच वेळ लागू शकतो.

- Advertisement -

डेली मेल या वृत्तपत्रात दिलेल्या वृत्तानुसार, गिल्बर्ट यांनी असे म्हटले आहे का, नेजल स्प्रेच्या माध्यमातून अनेक लसी दिल्या जातात. अशाप्रकारची कोरोना प्रतिबंध लस आम्ही शोधत आहोत. लसीप्रमाणेच तोंडामार्फत म्हणजेच गोळी किंवा टॅबलेटचे डोस देण्याचाही आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे येत्या काळात ज्यांना लस नको असले त्यांच्यासाठी गोळीचा उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे.


हेही वाचा – covid 19 vaccination : सरकारी लस मोफतच, जेष्ठ नागरिकांसाठी १ मार्चपासून कोरोना लसीकरण

- Advertisement -

 

- Advertisement -