घरट्रेंडिंगVideo: शाळा सुरू झाल्यानंतर काय करावे लागेल? हे सांगितले चीनने

Video: शाळा सुरू झाल्यानंतर काय करावे लागेल? हे सांगितले चीनने

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेने रविवारी शाळांकरिता मार्गदर्शन सूचना जारी केल्या. शाळा पुन्हा सुरू झाल्यास कोविड-१९ या महामारीपासून मुलांचा बचावकरण्याकरिता काय काय केले पाहिजे हे यात स्पष्ट केले. सध्या शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना काय करावे लागेल? याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मधल्या काही गोष्टी या जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीकोनाशी जुळत आहेत.

हा व्हिडिओ चीनचा असून यामध्ये कोरोनाच्या संकटात शाळेत जाण्यापूर्वी लहान मुलांची कशाप्रकारे काळजी घेतली जाईल ते दाखवले आहे. शाळेत जाण्यापूर्वी पाच स्टेप्स त्या मुलांने केल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याला शाळेत प्रवेश दिला आहे. हा व्हिडिओ हर्ष गोयंका या ट्विटर युजरने शेअर केला आहे. टिकटॉकवर देखील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या या संकटात सर्व शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र जर त्यानंतर शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आली तर विद्यार्थ्यांची काळजी घेण्याकरिता अनेक उपाययोजन करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

अजूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ४२ लाख ७७ हजार २४८वर पोहोचला आहे. त्यापैकी २ लाख ८७ हजार ६९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – LockDown: ५०० किलोमीटर पायपीट केल्यानंतर महिलेने एका झाडाखाली दिला मुलीला जन्म!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -