घरट्रेंडिंगमी भगवान विष्णुचा अवतार 'कल्की'... मला लवकर ग्रॅच्युईटीचे पैसे द्या नाही तर...,...

मी भगवान विष्णुचा अवतार ‘कल्की’… मला लवकर ग्रॅच्युईटीचे पैसे द्या नाही तर…, निवृत्त अधिकाऱ्याची अजब मागणी

Subscribe

गुजरातमध्ये एका माजी अधिकाऱ्याने ग्रॅच्युईटी पैसे लवकर मिळवण्यासाठी चक्क ‘भगवान विष्णु’चा अवतार असल्याचा दावा केला आहे. हा अधिकारी एवढ्यावरचं थांबला नाही तप त्याने ग्रॅच्युईटी मिळाली नाही तर आपल्या दिव्य शक्तींनी जगाला दुष्काळाचा शाप देईन अशी वाचाळ धमकीही दिली आहे. या अजब व्यक्तव्यामुळे हा अधिकारी भलताच प्रकाश झोतात आला आहे.

गुजरातचे रहिवासी असलेल्या आणि गुजरातच्या माजी जलसंपदा विभागाचे इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या या माजी अधिकाऱ्याचे नाव रमेशचंद्र फेफर आहे. वेळेपूर्वीच सेवानिवृत्त झालेल्या फेफर गेल्या काही दिवसांपासून आपले ग्रॅच्युईटीचे पैसै लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात फेफर यांनी १ जुलै रोजी जलसंपदा विभागाला पत्र व्यवहार केले. या पत्रात फेफर यांनी सरकारमध्ये बसलेल्या राक्षसांनी १६ लाख रुपयांची ग्रॅच्युईटी आणि एका वर्षाचे १६ लाख रुपयांचे माझे वेतन रोखून ठेवत त्रास देत आहेत. असा आरोप केला आहे. तसेच मी भगवान विष्णूचा दहावा अवतार कल्की असू, मला त्रास दिल्यास मी जबरदस्त दैवी शक्तींसह धरतीवर तीव्र दुष्काळ आणू शकतो असा धमकीवजा वाचाळ बडबड केली आहे. फेफर यांची ही वाचाळ बडबड आता अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे,

- Advertisement -

‘…तर जगात दुष्काळ आणेण’

माझ्या रुपाने धरतीवर भगवान ‘कल्की’ धरतीवर वावरत आहेत. गेल्या दोन वर्षांत भारतात चांगला पाऊस झाला असून एक वर्षही दुष्काळ झाला नाही. माझ्यामुळे गेल्या २० वर्षात चांगला पाऊस झाल्यानं भारताला २० लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. परंतु तरीही सरकारी राक्षस मला जाणून बुजून त्रास देत आहेत. आपल्याला वेतन दिलं जावं, अन्यथा यंदाच्या वर्षी संपूर्ण जगाला तीव्र दुष्काळाच्या झळा सहन करण्यासाठी भाग पाडेन, असं वाचाळ वक्तव्य रमेशचंद्र फेफर यांनी केलं आहे.

माजी अधिकारी रमेशचंद्र फेफर या अगोदरही २०१८ साली चर्चेचा विषय ठरले होते. त्यावेळीही त्यांनी स्वत: ला विष्णूचा अवतार असल्याचं सांगत कामावर येण्यास नकार दिला होता. त्यावेळी ते आठ महिन्यांच्या कालावधीत केवळ १६ दिवस कार्यालयात हजरं राहिले. यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. यानंतर रमेशचंद्र फेफर यांना सरकारी वेळेपूर्वीच सेवानिवृत्ती देण्यात आली होती. मात्र आता कार्यालयात हजेरी लावल्याशिवाय रमेशचंद्र फेफर वेतनाची मागणी करत आहेत.

- Advertisement -

रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी ‘गुळवेल’ ठरतेयं यकृतासाठी धोकादायक, डॉक्टरांचा इशारा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -