घरट्रेंडिंगआधारकार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा हे उपाय!

आधारकार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा हे उपाय!

Subscribe

हॅकर्सला आळा घालण्यासाठी यूआयडीआयने चांगली शक्कल लढवली आहे.

आधारकार्ड हे महत्वाचं कागदपत्रं म्हणून ओळखलं जातं. अनेक कामांच्या ठिकाणी आधारकार्डाचा उपयोग केला जातो. तसेच आधारकार्डची माहिती चोरीला गेली आहे, असे शब्द आपल्या कानावर सतत पडत असतात. आपल्या आधारकार्डची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी यूआयडीएआय ने लॉक/अनलॉक सुविधा आणली आहे. याच्या मदतीने आधारकार्ड अधिक सुरक्षित ठेवता येऊ शकतं. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड गरजेचं आहे. तसेच आधारकार्ड हे पॅनकार्डशी जोडणे अनिवार्य केलं आहे. यामुळे तुमचं आधारकार्ड सुरक्षित ठेवणं तुमची जबाबदारी आहे. तुमची माहिती चोरीला जाऊ नये, यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत आहे.

आधारकार्डची माहिती लॉक करण्याचे २ प्रकार आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून आधारकार्ड लॉक करण्यासाठी uidai.gov.in या वेबसाईटचा वापर करा किंवा तुमच्या मोबाईलवरुन १९४७ या क्रमांकावर मॅसेज करा. त्यानंतर तुमचे आधारकार्ड लॉक होईल.

- Advertisement -

आधारकार्ड लॉक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

– प्रथमता, www.uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
– वेबसाईटवर गेल्यानंतर माय आधार हे ऑप्शन निवडा.
-त्यानंतर ऑप्शन मध्ये लॉक/अनलॉक ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा

लॉक करण्यासाठी यूआयडी नंबर, तुमचं संपूर्ण नाव, पिनकोड ही माहिती भरावी लागेल. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी नंबर भरल्यानंतर आधारकार्ड लॉक होईल. अनलॉक करण्यसाठी सेक्युरिटी कोड टाकावे लागणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -