घरताज्या घडामोडीठाकरे सरकारच्या 12 घोटाळेबाजांना हिशेब द्यावा लागणार, किरीट सोमय्यांनी यादीच दाखवली

ठाकरे सरकारच्या 12 घोटाळेबाजांना हिशेब द्यावा लागणार, किरीट सोमय्यांनी यादीच दाखवली

Subscribe

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची नावे ट्विट करुन घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागणार असा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. दाऊद कनेक्शन आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीने छापेमारी केली आहे. अनेक नेत्यांवर ईडीची चौकशी सुरु आहे. नवाब मलिक यांच्या घरी ईडीने छापेमारी करत त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांच्या नंतर आता तिसरा नंबर शिवसेनेच्या नेत्याचा असल्याचा इशारा भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील नेते भ्रष्टाचारी असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी अनेक नेत्यांविरोधात ईडीकडे तक्रारी केल्या आहेत. शिवसेना नेते अनिल परब, शिवसेना खासदार किरीट सोमय्या, सुजीत पाटकर, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, अनिल देशमुख, नवाब मलिक या घोटाळेबाजांना हिशोब द्यावा लागेल असा इशारा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. यामध्ये आतापर्यंत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. तर आता राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. मलिकांनंतर आता त्यांच्या भावाला ईडीने समन्स बजावले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील नेत्यांवर ईडीची कारवाई होत असल्यामुळे राजकीय सूड भावनेने ही कारवाई होत असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार भावना गवळी यांच्या मालमत्तेवरसुद्धा ईडीने छापेमारी केली आहे. तसेच या छापेमारीमध्ये काही मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती मिळाली होती. तसेच आर्थिक गैरव्यवहारामध्ये शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्या घरी ईडीची छापेमारी करण्यात आली होती. यानंतर रविंद्र वायकर यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविंद्र वायकर यांना ईडीचे समन्स जारी करण्यात आले होते परंतु त्यांनी चौकशीला हजेरी लावली नव्हती.


हेही वाचा : ED : प्रवीण राऊतांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामिनासाठीचा मार्ग मोकळा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -