घरट्रेंडिंगशेजारणीला भेटण्यासाठी पठ्ठाने केला जुगाड, घराखालीच केला भुयारी मार्ग

शेजारणीला भेटण्यासाठी पठ्ठाने केला जुगाड, घराखालीच केला भुयारी मार्ग

Subscribe

विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक जण आपल्या विवाह्य प्रेयसीला भेटण्यासाठी आपल्याला न सुचणारे कारनामे करत असतात. आता एका पठ्ठाने शेजारणीला भेटण्यासाठी केलेला कारनामा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या पठ्ठाने चक्क आपल्या शेजारणीला भेटण्यासाठी घराखाली भुयारी मार्ग तयार केला. या भुयारी मार्गाच्या माध्यमातून तो नेहमी आपल्या शेजारील महिलेला भेटायला जात होता. पण त्याचा हा कारनामा काही दिवसांनंतर महिलेच्या पतीसमोर उघड झाला आणि शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. ही घटना मॅक्सिकोमधील आहे.

शेजारील महिला ही आपल्या पतीसोबत राहत होती. तिला भेटण्यासाठी तिच्या प्रियकराने आपल्या घरापासून ते तिच्या घरापर्यंत एक भुयारी मार्ग तयार केला. त्यानंतर या महिलेशी संबंध ठेवण्यासाठी तो या भुयारी मार्गातून ये-जा करत असे. डेली मेलच्या वृत्तानुसार, या प्रियकराचे नाव अल्बर्टो असून तो मॅक्सिकोच्या तिजुआना परिसरात राहतो. तसेच प्रियसी महिलेचे नाव पामेला असे आहे. जेव्हा पामेलाचा नवरा कामावर जात असे. तेव्हा अल्बर्टो भुयारी मार्गातून महिलेला भेटण्यासाठी येत असे. पण एकेदिवशी हे पितळं पतीसमोर उघड पडले.

- Advertisement -

पामेलाचा पती जॉर्ज एके दिवशी कामावरून लवकर घरी परतला. त्यावेळेस महिलेला प्रियकर अल्बर्टोसोबत रंगेहाथ पकडली. अल्बर्टो हा काउचच्या मागे लपला होता, हे पतीला माहित होते. पण नंतर तो अचानक गायब झाला. मग जॉर्जेने पूर्ण घर त्याला शोधले. पण तो काही सापडला नाही. शेवटी जॉर्जने घराची झडती घेतली आणि त्यावेळेस काउचच्या खाली एक भुयारी मार्ग त्याला दिसला. तेव्हा तो भुयारी मार्गातून पुढे गेला आणि तो पत्नीचा प्रियकर अल्बर्टोच्या घरी जाऊन पोहोचला. यामुळे पत्नीचे सर्व पितळ उघडे पडले.

हा भुयारी मार्ग एक चांगल्या प्रकारे तयार करण्यात आला होता. पण हा भुयारी मार्ग तयार करून किती दिवस झाले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. जेव्हा प्रियकर अल्बर्टो रंगहाथ सापडला तेव्हा त्याने जॉर्जला आपल्या पत्नीला याबाबत न सांगण्याची विनंती केली. पण जॉर्जने याला नकार दिला. मग दोघेही एकमेकांशी भांडू लागले आणि त्यानंतर भांडण इतके वाढले की, पोलिसांना घटनास्थळी बोलाववे लागले.

- Advertisement -

हेही वाचा – BRAVO, माणसं नव्हे चक्क अजगरच करतात बॉडी मसाज! कधी केलाय का असा मसाज?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -