घरट्रेंडिंगLockDown: नुसरत जहाँच्या भन्नाट डान्सला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; दिलं असं उत्तर!

LockDown: नुसरत जहाँच्या भन्नाट डान्सला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; दिलं असं उत्तर!

Subscribe

ट्रोलर्ससाठी एक व्हिडीओ बनवून त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

कोरोनाव्हायरसमुळे १७ मे पर्यंत भारत लॉकडाऊन आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत लोक घरी राहून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे मनोरंजन करत आहेत. बॉलिवूड स्टार्स असो, स्पोर्ट्स स्टार्स असो किंवा वा राजकारणी… सर्वजण घरी राहून सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना व्हायरस बद्दल लोकांना जागृत करत आहेत.

दरम्यान, बंगाली चित्रपटाची एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसची खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. लॉकडाऊनमध्ये तिने टिकटॉकवर एक डान्सचा व्हिडीओ केला होता. त्यावेळी नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले होते. त्यानंतर तिने या ट्रोलर्ससाठी एक व्हिडीओ बनवून योग्य प्रत्युत्तर दिले आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

@nusratchirps

For my trollers… love from me to u..!! ? Believe me I know my job..!! ? #stophatred #bepositivestaypositive #showsomelove @tiktok_india

♬ Original Sound – Unknown

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये नुसरत ‘आंखों में बसे हो तुम…’ या गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तिने ७ मे रोजी रात्री शेअर केला आहे. यावेळी तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले की, ‘For my trollers… love from me to u..!! Believe me I know my job..!!’

@nusratchirps

#Savage #savagechallenge #fyp let’s do it @mimichakraborty86 @srabantigintu my #savagegirls

♬ Savage – Megan Thee Stallion

- Advertisement -

काही दिवसांपुर्वी केलेल्या व्हिडीओवर ट्रोलर्सने निशाणा साधला आहे. नुसरत जहाँला या व्हिडीओवरून खूप ट्रोल करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी नुसरत यांना आपल्या विभागातील लोकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना टॅग करत लिहिलं आहे की, ‘तुम्ही कोणाला खासदार बनवले आहे? लाज वाटली पाहिजे.’ याशिवाय आणखीन एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘त्यांच्या मतदारसंघातील लोकांनी रेशनची मागणी केल्यामुळे त्यांना मारहाण केली असता खासदार व्हिडीओमध्ये करण्यात व्यस्त आहेत.’


Video: ममता बॅनर्जींंची काढली लाज, टिकटॉक व्हिडिओमुळे नुसरत जहाँ ट्रोल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -