घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटट्रम्प यांची रोज होणार कोरोना टेस्ट, वाचा कारण...

ट्रम्प यांची रोज होणार कोरोना टेस्ट, वाचा कारण…

Subscribe

अमेरिकेत ७६ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १२ लाख ९२ हजार ८५० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  

आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची दररोज कोरोनाची चाचणी होणार आहे. केवळ डोनाल्ड ट्रम्प यांची नाही तर उपराष्ट्रपती आणि व्हाईट हाऊसच्या इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार आहे. कारण ट्रम्प यांच्या ताफ्यातील एका सैनीकाला कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनंतर अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतला आहे. या आदेशाच्या आधी ट्रम्प यांची दोनदा कोरोना व्हायरस चाचणी झाली होती. दोन्ही वेळा त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता.

सैन्याला कोरोनाची लागण झाल्यावर राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले की, त्यांचा त्याच्या सैनीकाशी संपर्क नव्हता. उपराष्ट्रपतींबरोबर देखील माझा कमी संपर्क आहे. आमच्या दोघांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्याचबरोबर च्रम्प यांन बोलताना चीनवर निशाणा साधला आहे. जगभऱात कोरोना पसरवायला चीन कारणीभूत ठरलं आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे जगभरात २ लाख ६४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३७ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकट्या अमेरिकेत ७६ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १२ लाख ९२ हजार ८५० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकांचा जीव धोक्यात न घालता पुन्हा आर्थिक क्रिया सुरू करण्यावर भर दिला आहे. तुम्ही हळू हळू लॉकडाऊन उघडत आहेत तसेच कोरोना विषाणू साथीच्या आजारापासून लोकांचे संरक्षण करत असलेली राज्ये पाहा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी कबूल केले की दोन्ही बाजूंकडून होणारी भीती न्याय्य आहे. ते म्हणाले, काही लोकांना या आजाराची चिंता आहे, तर इतरांना नोकरी गमावण्याची भीती आहे. लॉकडाऊनमुळे ३ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे अर्थव्यवस्था हाताळण्यासाठी सध्या खर्च करण्याची गरज आहे, असं यूएस सेंट्रल बॅंकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – Video – शाहरूख खानच बेताल वागणं बघून नेटकरी हैराण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -