घरट्रेंडिंगया बाईंनी अर्नोल्ड श्वार्झनेगरचे नामकरण केले 'सुभाष नगर'

या बाईंनी अर्नोल्ड श्वार्झनेगरचे नामकरण केले ‘सुभाष नगर’

Subscribe

मिसेस राजेश्वरी या नावाने इन्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या प्रोफाईनेल अनेक मनोरंजनात्मक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत.

हॉलिवूडचा प्रसिद्ध नायक अर्नोल्ड श्वार्झनेगरला ओळखत नाही, असा एकही हॉलिवूडचा चाहता नाही. ९०च्या दशकापासून आपल्या पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर अॅक्शन चित्रपट करणारा अर्नोल्ड अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. अर्नोल्डचे आडनाव भारतीयांना उच्चारण्यासाठी थोडे अवघड जाते. म्हणून तो त्याच्या पहिल्या नावानेच जगप्रसिद्ध आहे. मात्र मिसेस राजेश्वरी या मास्तर बाईंनी अर्नोल्डच्या नावाचा असा काही उच्चार केलाय की त्यांचा हा व्हिडिओ पाहून इंटरनेटवर चांगलाच हशा पिकलाय. आपल्या इन्स्टा अकाऊंटवर या बाईंनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्या अर्नोल्डचे आडनाव ‘सुभाष नगर’ असल्याचे सांगतात.

- Advertisement -

ही बातमी करेपर्यंत या व्हिडिओला १५ हजार व्ह्यूज मिळाले होते. अनेकांनी या व्हिडिओखाली कमेंट करून अर्नोल्डच्या नव्या नावाला पसंती दिली आहे. तर अनेकांनी आपला संताप देखील व्यक्त केला आहे. असे चुकीचे उच्चार करून आपल्याला काय साध्य करायचे आहे? भारताची चुकीची प्रतिमा आपण जगासमोर का मांडतोय? अशा स्वरुपाच्याही कमेंट या व्हिडिओखाली आल्या आहेत.

कोण आहेत मिसेस राजेश्वरी

मिसेस राजेश्वरी या टिक टॉक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगल्याच प्रसिद्ध आहेत. चुकीचे इंग्लिश कसे बोलावे? याचा वस्तूपाठच राजेश्वरी यांनी आपल्या प्रोफाईलवर दाखवलेला आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील काही दिवसांपूर्वी मिसेस राजेश्वरी यांचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. एस. राजेश्वरी यांच्या चुकीच्या उच्चारानंतर टिक टॉक अॅपवर चुकीचे इंग्लिश बोलण्याचा ट्रेंड सुरु झाला होता.

- Advertisement -

याआधी मिसेस राजेश्वरी यांचे प्रंचड लोकप्रिय झालेले काही व्हिडिओ.

टिक टॉकचे पुर्वी म्युजिकली अॅपवर देखील मिसेस राजेश्वरी या चांगल्याच लोकप्रिय होत्या. बॉलिवूडचे कॉमेडी अभिनेते गौरव गेरा यांना देखील राजेश्वरी यांच्यासोबत व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -