घरट्रेंडिंगचुंबनाचा फोटो काढणाऱ्या 'त्या'ला मारहाण, गमावली नोकरी

चुंबनाचा फोटो काढणाऱ्या ‘त्या’ला मारहाण, गमावली नोकरी

Subscribe

जोडप्याचा चुंबन घेतानाचा हा फोटो संस्कृतीला काळीमा फासणारा असल्यामुळे, तो त्वरित काढून टाकावा अशी मागणी स्थानिक लोक करत आहेत.

सोशल मीडियावर कधी कोणता फोटो व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतो आहे. बांग्लादेशमधील एक जोडपं पावसात ‘किस’ करतानाचा हा फोटो सध्या जगभरात चांगलाच व्हायरल होत आहे. ढाका विद्यापिठाच्या परिसरातील हा फोटो असून, या फोटोतील जोडपं पावसाचा आनंद घेत, एकमेकांना किस करताना दिसत आहेत. सहसा सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करणारे एका रात्रीमध्ये स्टार बनून जातात. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. मात्र, या फोटो बाबतीत याच्या नेमकं उलट झालंय. प्रेमीयुगुलाचा चुंबन घेतानाचा हा फोटो काढणाऱ्या आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या फोटोग्राफरला मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर जोडप्याचे चुंबन घेतानाचे खासगी क्षण, कॅमेरात कैद करणाऱ्या या फोटोग्राफरला नोकरीवरुनही निलंबीत करण्यात आले आहे. जिबॉन अहमद असं या फोटोग्राफरचं नाव असून, चुंबनाचा हा फोटो काढून तो व्हायरल करणं त्याला चांगलच महागात पडलं आहे. सोशल मीडियावर या फोटोवरुन नेटिझन्सची जोरदार चर्चा पाहायला मिळते आहे.

फोटोवरुन नेटिझन्समध्ये २ गट

दरम्यान व्हायरल होत असलेल्या या ‘किसींग’ फोटोमुळे इंटरनेटवर लोकांच्या कमेंट्सना आणि शेरेबाजीला उधाण आलं आहे. जिनॉबने हा फोटो सोशल मीडियावर अपलोड करतेवेळी त्याला ‘ही भाग्यवान पावसाची कविताच आहे जणू, प्रेम असेच मुक्त असते’ अशाप्रतराची कॅप्शन दिली आहे. अशाप्रकारचा फोटो काढण्याच्या आणि तो व्हायरल करण्याच्या वादावरुन नेटिझन्समध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. ‘जोडप्याचे खासगी क्षण अशाप्रकारे व्हायरल करणं चूक आहे’, असं काही लोकांच म्हणणं आहे. तर काही लोक या फोटोची प्रशंसा करत त्याला समर्थन देत आहेत. सध्या बांग्लादेशमध्ये इस्लामिक कट्टरपंथी विरुद्ध बंगाली राष्ट्रवाद अशा नव्या वादाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचा किसींग फोटो हा संस्कृतीला काळीमा फासणारा आहे, त्यामुळे हा फोटो त्वरित डिलीट करावा अशी मागणी काही लोक करत आहेत.


फोटो काढणं पडलं महागात

फोटोग्राफर ‘हा’ फोटो कैद करत असताना काही स्थानिक लोकांनी हेरले होते. फोटोग्राफरचे हे कृत्य चुकीचे वाटल्यामुळे लोकांनी त्याला अडवले. त्यांच्यामध्ये झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर पुढे जाऊन मारहाणीत झाले. जमावाने  जिबॉन अहमद याला चांगलीच मारहाण केली. हे प्रकरण सोशल मीडियावर आणि स्थानिक माध्यमांमध्ये चिघळल्यावर, अहमद ज्या वेबसाईटसाठी काम करत होता त्या कंपनीने त्याला त्वरित निलंबीत केलं. दरम्यान ढाका विद्यापिठाच्या प्राध्यापिका फातिमा धूर्त यांनी, ‘अहमदवर अन्याय झाला आहे’, या भावनेतून एक ट्वीट केले आहे. ‘जे लोक महिलांची छेड काढतात त्याच लोकांना हे असे प्रेम आणि मैत्रीचे दर्शन घडवणारे फोटो खटकतात’, अशा अर्थाचं वक्तव्य फातिमा यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -