घरट्रेंडिंगPNB Recruitment 2021: शिपाई पदांसाठी भरती; १०वी,१२ वीच्या गुणांवर होणार निवड

PNB Recruitment 2021: शिपाई पदांसाठी भरती; १०वी,१२ वीच्या गुणांवर होणार निवड

Subscribe

जाणून घ्या,सविस्तर माहिती

पंजाब नॅशनल बँकेने सर्बोडिनेट केडरमधील शिपाई पदावर भरतीसाठी विविध मंडळांतर्गत असलेल्या शाखेत जाहिराती दिल्या आहेत. बँकेच्या विविध मंडळांच्या कार्यालयाद्वारे जाहीर केलेल्या वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून मंडळाच्या अंतर्गत शाखांमधील शिपाई पदाच्या एकूण १११ रिक्त पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या मंडळांमध्ये पीएनबी शिपाई भरती २०२१ च्या जाहिराती देण्यात आल्या आहेत, त्यात सूरत सर्कल, बंगळुरू पूर्व सर्कल, बंगळुरू पश्चिम सर्कल, बालासोर सर्कल, चेन्नई सर्कल आणि हरियाणा सर्कल यांचा समावेश आहे.

असा करा अर्ज

पीएनबी भरती २०२१ अंतर्गत शिपाई पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना संबंधित बोर्ड कार्यालयात दिलेल्या जाहिरातीसह अर्ज द्यावा लागणार आहे. मंडळांनुसार अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख चेन्नई आणि बंगळुरू पश्चिम सर्कलसाठी शेवटची तारीख २२ आणि २७ फेब्रुवारी २०२१ अशी आहे, तर सूरत, बंगळुरू पूर्व आणि बालासोर सर्कलसाठी शेवटची तारीख १ मार्च आणि हरियाणा सर्कलसाठी ४ मार्च आहे.

- Advertisement -

अशी हवी पात्रता

ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. पंजाब नॅशनल बँकेत शिपाईपदासाठी मागवण्यात आलेल्या अर्जदाराला इंग्रजीत वाचन आणि लेखन करता येणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त १ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षेदरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव वर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याचीही तरतूद आहे. दुसरीकडे पंजाब नॅशनल बँकेतील शिपाई पदासाठी उमेदवारांची दहावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार निवड केली जाईल.

या ठिकाणी होणार रिक्त पदांची भरती

  • चेन्नई दक्षिण सर्कल – २०
  • बालासोर सर्कल – १९
  • बेंगळुरू पूर्व मंडळ – २५
  • बंगलोर वेस्ट सर्कल – १८
  • सुरत सर्कल – १०
  • हरियाणा – १९
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -