घरट्रेंडिंगअरेच्चा! गोव्यातील 'हे' जंगल रात्री होतं प्रकाशमान; जवळून पहाल तर...

अरेच्चा! गोव्यातील ‘हे’ जंगल रात्री होतं प्रकाशमान; जवळून पहाल तर…

Subscribe

आतापर्यंत प्रकाश-उत्सर्जित करणाऱ्या मशरूमच्या ५० प्रजाती सापडल्या आहेत. गोव्यात सापडलेली मशरूम केवळ पावसाळ्यातच दिसतात.

तुम्ही मशरूमचे अनेक प्रकार पाहिले किंवा खाल्ले असतील मात्र तुम्ही कधी लाईट्स सारखे उजेड देणारे मशरूम पाहिले आहे? परंतु हे खरं आहे, जे मशरूम प्रकाश देतात. त्याला बायो-ल्यूमिनिसेंट मशरूम असे म्हणतात. हे दुर्मिळ प्रकाश देणारे मशरूम गोव्याच्या जंगलात दिसून आले आहे. रात्रीच्या अंधारात, ते हलके निळ्या-हिरव्या आणि जांभळ्या रंगात चमकताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

हे प्रकाशमय मशरूम गोव्याच्या म्हाडेई वाइल्डलाइफ सेंच्युरीमध्ये (Mhadei Wildlife Sanctuary) दिसून आले आहे. या सेंच्युरीला मोलेम नॅशनल पार्क किंवा महावीर वाइल्डलाइफ सेंच्युरी नावानेही ओळखले जाते. ही सेंच्युरी गोव्याच्या पश्चिम घाटावर आहे. दिवसा, हे मशरूम सामान्य मशरूमसारखे दिसते परंतु रात्रीच्या वेळी त्यातून प्रकाश बाहेर पडतो.

- Advertisement -

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, मशरूमच्या या प्रजातीस माइसेना जीनस (Mycena Genus) म्हणतात, ज्यामुळे ते रात्री थोडासा प्रकाश पाडतात. हे मशरूम रात्री प्रकाशाचे उत्सर्जन करते जेणेकरून त्यावरील बीजाणू कीटकांमधून जंगलातील इतर ठिकाणी पसरतील आणि या मशरूमची संख्या वाढण्यास मदत होईल.

ही एक विशेष प्रकारची बुरशी (Fungi) आहे. आतापर्यंत प्रकाश-उत्सर्जित करणाऱ्या मशरूमच्या ५० प्रजाती सापडल्या आहेत. गोव्यात सापडलेली मशरूम केवळ पावसाळ्यातच दिसतात. तसेच त्यांना जंगलात पसरण्यासाठी आणि वाढीसाठी पुरेसा ओलावा लागतो. तसेच, तापमान २१ डिग्री सेल्सियस ते २७ डिग्री सेल्सियस पर्यंत असणे गरजेचे असते. महावीर वाइल्डलाइफ सेंच्युरीमध्ये पावसाळ्यात त्यांची संख्या बर्‍याच प्रमाणात वाढते. त्यांना शोधणे फार कठीण नाही परंतु त्यासाठी रात्री जंगलात फिरावे लागते.

गोव्यातील बिचोलीम तालुक्यातील मेनकुरेम भागातील संस्कृती नायक जंगलात फिरण्यासाठी गेल्या तेव्हा या मशरूमची माहिती मिळाली. जंगलात चमकणारा मशरूम पाहून त्यांनी वनविभागाला माहिती दिली. यानंतर शास्त्रज्ञांनी जाऊन त्याचे छायाचित्र काढले व संशोधन केले. संस्कृती म्हणाली की, अशा मशरूमबद्दल मला कल्पना नव्हती. रात्री जेव्हा मी पहिल्यांदा मशरूम चमकताना पाहिले तेव्हा मी स्तब्ध होतो. मी पाहिले की जंगलातल्या झाडांची खोड आणि जमिनीतून मुळे चमकत आहेत. ते खूप सुंदर दिसत असल्याने मी त्याच्या जवळ गेले आणि जवळून पाहिले तर ते मशरूम होते. ज्यामधूम हलका निळा-हिरवा प्रकाश बाहेर येत होता त्यामुळे संपूर्ण जंगल प्रकाशमान झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -