सांगा पाहू नदीवर किती हत्ती पाणी पित आहेत? फोटो पाहून द्या योग्य उत्तर, 99 टक्के लोक झालेत फेल

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये नदीकाठी हत्ती पाणी पित आहेत. हत्ती आपल्या सोडेंनी पाणी ओढून आपली तहान भागवतात. हा फोटो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विट केला आहे. त्यांनी फोटो शेअर करत नदीकाठी किती हत्ती पाणी पित आहेत असा प्रश्न केला आहे.

solve puzzle How many elephants are drinking water on the river?
सांगा पाहू नदीवर किती हत्ती पाणी पित आहेत? फोटो पाहून द्या योग्य उत्तर, 99 टक्के लोक झालेत फेल

सोशल मीडियावर अशा काही गोष्टी व्हायरल होत असतात ज्या पाहून आपले डोके कधी कधी चक्रावून जाते. सोशल मीडियावर अनेक गेम्स, पझल्स सतत व्हायरल होत असतात. जे सोडवणे कधी कधी फार अवघड होऊन बसते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय ज्यात हत्ती नदीकाठी पाणी पित आहेत. या फोटोत किती हत्ती पाणी पित आहेत हे आता ओळखायचे आहे. तर लावा डोक आणि सांगा नदीकाळी किती हत्ती पाणी पिताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये नदीकाठी हत्ती पाणी पित आहेत. हत्ती आपल्या सोडेंनी पाणी ओढून आपली तहान भागवतात. हा फोटो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विट केला आहे. त्यांनी फोटो शेअर करत नदीकाठी किती हत्ती पाणी पित आहेत असा प्रश्न केला आहे. त्यांनी ट्विट केलेला हा फोटो आणि प्रश्न सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

फोटोवर पहिली नजर टाकली तर नदीकाठी चार हत्ती पाणी पिताना दिसत आहेत. मात्र याचे उत्तर देणे इतके सोप्पे नाहीये. जर तुम्ही फोटो नीट निरिक्षण करुन पाहिलात तर यात चारहून अधिक हत्ती आहेत. नेमके किती हत्ती आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मेंदू आणि डोळ्यांवर जरा जोर द्यावा लागेल. त्यासाठी पुन्हा हा फोटो योग्यरित्या पाहा आणि फोटोत एकूण किती हत्ती आहेत ते ओळखा.

हे आहे योग्य उत्तर

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या फोटोत नदीकाठी एकूण सात हत्ती पाणी पित आहेत. आयएफएस सुशांत नंदा यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये याचे उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा फोटो क्लिक करण्यासाठी फोटोग्राफरला फार मेहनत घ्यावी लागली. हत्ती जवळपास 20 मिनिटे नदीकाठी पाणी पित होते. हत्ती आपल्या सोंडेने पाणी ओढून आपली तहान भागवत होते. एका रेषेत 7 हत्ती पाणी पित असतानाचा परफेक्ट फोटो येई पर्यंत 20 मिनिटात फोटोग्राफरने जवळपास 1400 फोटो काढले.

या फोटोवर फार तुरळक लोकांनी योग्य उत्तरे दिली. तुम्हाला हत्तीची एकूण संख्या मोजायला किती वेळ लागला? याचे उत्तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्याचप्रमाणे हा फोटो आणि बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या गेमचा जास्तीत जास्त आनंद घ्या.


हेही वाचा – National Hugging Day 2022: बॉलिवूड सिनेमातील ‘हे’ 6 बेस्ट Hug सीन्स पाहिलेत का?