घरताज्या घडामोडीसोशल मीडियावर स्त्रियांचा अपमान, विरोध करण्यासाठी लोकांनी एकत्र यावं - स्मृती इराणी

सोशल मीडियावर स्त्रियांचा अपमान, विरोध करण्यासाठी लोकांनी एकत्र यावं – स्मृती इराणी

Subscribe

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्त्रियांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे किंवा त्यांचा अपमान करणं अशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. बुली बाई अॅप प्रकरण आणि सुली डील अॅप प्रकरण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. परंतु दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी दोन्ही अॅपविरोधातील मुख्य आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर महिलांचा सन्मान राखला जात नाहीये. मग त्या कुठल्याही धर्माच्या असोत. परंतु या विरोधात पक्षीय राजकारण विसरून लोकांनी आवाज उठवायला हवा, अशी खंत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर स्त्रियांचा अपमान

एका इंग्रजी वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान स्मृती इराणी बोलत होत्या. सोशल मीडियावर महिलांचा सन्मान राखला जात नाहीये. त्यामुळे इंटरनेट आणि सोशल माडिया प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षतेसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालय विभागासोबत सक्रीय स्वरूपात काम करत असल्याचं इराणी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कुठल्याही प्रकारचा धर्म पाहिला जात नाहीये

सध्या महिलांची सोशल मीडियावर एका भावनेतून बदनामी केली जात आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा धर्म पाहिला जात नाहीये. परंतु मी पोलिसांचे आभार मानेन. कारण त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय. त्यामुळे यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांना शिक्षा मिळेल याची मला खात्री आहे. पोलीस आणि न्याय व्यवस्थेत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक प्रकरणं समोर येतील. अशी आशाही स्मृती इराणी यांनी व्यक्त केली आहे.

लैंगिक भावनेतून महिलांना पाहिलं जातंय का?

बुली बाई अॅप प्रकरणात अभिनेता सिद्धार्थचं साईना नेहवालविरोधात आक्षेपार्ह ट्विट तसेच दिल्लीतील निर्भाया प्रकरणी संदर्भात इराणी यांनी चर्चा केली. यावेळी महिलांना एका अॅपच्या माध्यमातून केवळ लैंगिक भावनेतून पाहिलं जातंय का, असा सवाल देखील इराणींनी उपस्थित केला आहे. दरम्यान, जेव्हा संसदेत मी मुलींच्या लग्नाच्या वयात २१ व्या वर्षांपर्यंत वाढ करण्याची मागणी केली. तेव्हा देखील मला देशभरातून पाठींबा मिळाला, असे इराणी म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा : ITR Filing : करदात्यांना मोठा दिलासा, आयटी रिटर्न्स भरण्याच्या मुदतीत वाढ, जाणून घ्या डेडलाईन?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -