घरट्रेंडिंगअजब-गजब : ८ तासांत कापले ९७२ जणांचे केस

अजब-गजब : ८ तासांत कापले ९७२ जणांचे केस

Subscribe

केस कापण्याच्या दुकानात आपण जातो, तेव्हा केस कापणाऱ्या नाभिकाला (केशकर्तनकार) आपले केस कापण्यासाठी कमीत कमी २० मिनिटे तरी लागतात. परंतु दोन ‘कलाकार’ केशकर्तनकारांनी केस कापण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. हे दोघे कलाकार अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. मनोज शिंदे आणि पूनम शिंदे असे विक्रम करणाऱ्या दोन केशकर्तनकारांची नावे आहेत. मनोज शिंदे आणि पूनम शिंदे या दोघांचे अहमदनगरमध्ये ‘बियॉन्ड ब्युटी सलून’ नावाचे केशकर्तनालय आहे. अहमदनगरमधील बाणेश्वर विद्यालयात मंगळवारी सकाळी मनोज आणि पूनम यांनी केस कापण्याला सुरुवात केली आणि पुढील आठ तासांमध्ये म्हणजेच जवळजवळ ४८० मिनिटात तब्बल ९७२ जणांचे केस कापले. विशेष म्हणजे या ९७२ जणांमध्ये महिला आणि पुरूष अशा दोघांचाही समावेश होता. मनोज आणि पूनम यांनी केलेल्या या विक्रमाची नोंद ‘ग्लोबल रेकॉर्ड रिसर्च फाऊंडेशन इंडिया’च्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

आधीचा रेकॉर्डदेखील महाराष्ट्राकडेच होता

विशेष म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांचे केस कापण्याचा जुना रेकॉर्डदेखील महाराष्ट्राच्याच नावावर होता. जळगाव येथील जय निकम आणि प्रीती निकम यांनी १० तासांत (६०० मिनिटांमध्ये) ६९१ जणांचे केस कापून विक्रमाची नोंद केली होती. मात्र, आज मनोज आणि पूनम शिंदे यांनी हा विक्रम मोडून स्वतःच्या नावावर नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -