घरट्रेंडिंग३१ डिसेंबरची हवा; हॉटेलचे भाडे ११ लाख रुपये

३१ डिसेंबरची हवा; हॉटेलचे भाडे ११ लाख रुपये

Subscribe

३१ च्या पार्टीचं सेलिब्रेशन करण्यासाठी जोधपूरच्या 'उम्मेद भवन'च्या एका रात्रीचं भाडं तब्बल ११ लाख रुपये इतकं आहे.

आनंदाला आणि तो साजरा करण्याला ‘मोल’ नसतं असं म्हणतात. सेलिब्रिटींनी किंवा उद्योगपतींनी करोडो रुपये खर्च करुन थाटात लग्न सोहळा केल्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. मात्र, आता सर्वांना वेध लागले आहेत ते नवीन नव वर्षाच्या स्वागताचे. नवीन वर्षाचं स्वागत प्रत्येकजण आपापल्यापरिने करत असतो. प्रत्येकजण आपापल्या खिशाला परवडेल त्यानुसार ३१ डिसेंबरच्या ‘न्यू इयर पार्टीचं’ सेलिब्रेशन करत असतो. याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणेच यंदाही अनेक हॉटेल्सचे आणि पर्यटनस्थळांचे भाव वाढला आहे. मात्र, या यादीत सर्वांचं लक्ष वेधून घेतोय तो  जोधपूरचा ‘उम्मेद भवन’ पॅलेस. प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांच्या विवाहानंतर आता उदयपूरच्या या पॅलेसला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे साहाजिकच इथला भाड्याचा दरही आता वाढला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार ३१ च्या पार्टीचं सेलिब्रेशन करण्यासाठी ‘उम्मेद भवन’च्या एका रात्रीचं भाडं तब्बल ११ लाख रुपये इतकं आहे. या यादीत जोधपूरच्याच ‘ताज लेक’ पॅलेसचाही समावेश आहे.


वाचा: करा एन्जॉय; २०१९ मध्ये ‘या’ आहेत मोठ्या सुट्ट्या

समोर आलेल्या अहवालानुसार, राजस्थानमधील पंचतारांकित आणि राजेशाही हॉटेल्सना न्यू इयर पार्टीसाठी यंदा सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा यावर्षी या हॉटेल्सचा भावही वधरला आहे. जयपूरच्या ताज रामबाग पॅलेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिलक्स रूमचे भाडे सर्वसाधारण रूमच्या तुलनेत नेहमीच जास्त असते. दरवर्षी ३१ डिसेंबरसारख्या दिवशी यात साहजिकच अधिक वाढ होते. मात्र. यंदाच्या वर्षी या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयटीसी राजपुतानाचे महाव्यवस्थापक मेहरोत्रा यांनी सांगितल्यानुसार, ‘राजस्थानसारखी महाग आणि अलिशान हॉटेल्स देशात फार मोजकी आहेत. न्यू इयर पार्ट्यांसाठी बरेचसे लोक या प्रकारच्या हॉटेल्सना पसंती देतात. त्यांच्या लेखी पैशापेक्षा आनंद आणि अत्याधुनिक सोयीसुविधा यांनाचा जास्त महत्व असतं. त्यामुळे यावर्षी भाव वाढूनही आमच्याकडे जवळपास ९० टक्के इतकं बुकींग झालं आहे. एकंदरच प्रियांका आणि निकच्या लग्नानंतर जोधपूरच्या उमैद भवनाला ‘भाव’ आला आहे असंच म्हणावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -