घरदेश-विदेशअजून एका भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप, तक्रार दाखल

अजून एका भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप, तक्रार दाखल

Subscribe

उन्नाव सामुहिक बलात्कार प्रकरणाला दोन महिने उलटत नाहीत, तोच उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये आणखी एका सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेमध्येही एका भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

 

- Advertisement -

————————————————————————————————————————————-

बरेलीमध्ये घडली घटना

काही दिवसांपूर्वी झालेल्या उन्नाव आणि कथुआ बलात्कार प्रकरणांमुळे अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यातही या दोन्ही घटनांमध्ये भाजपशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्यामुळे इतर पक्षांनी भाजपविरोधात टीकेची चांगलीच राळ उडवून दिली होती. मात्र, बरेलीमधल्या या ताज्या घटनेमुळे पुन्हा एकदा भाजपविरोधात वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

————————————————————————————————————————————–

दोन वर्ष केला बलात्कार

भाजपचे बदायूनमधील आमदार कुशांग सागर यांच्यावर त्यांच्या घरकामगार महिलेच्या मुलीवर दोन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपल्याशी लग्न करण्याचं आश्वासन देत कुशांग सागर यांनी दोन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरूणीने केला आहे.

मला जर न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन. मी सत्य सांगितल्यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याचं १७ तारखेला दुसऱ्या मुलीशी लग्न होणार आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी मला २० लाख रुपयेही देऊ करण्यात आले होते.

पीडित मुलगी

तक्रार दाखल, तपास सुरू

दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई ही कुशांग सागर यांच्याकडे घरकाम करते. मंगळवारी पीडितेने यासंदर्भातल तक्रार दाखल केली असून या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.

बाप से बेटा कमीना! 

कुशांग सागरचे वडील आणि माजी बसपा आमदार योगेंद्र सागर याआधीच जेलमध्ये आहे. २००८ साली एका कॉलेज तरूणीचं अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याच्या गुन्ह्याची तो शिक्षा भोगत आहे. काही वर्षांनी पीडित मुलीचा रस्ते अपघातात संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यानंतर योगेंद्रला २०१६मध्ये खुनाच्या आरोपांतही दोषी ठरवण्यात आले.

उन्नाव प्रकरणात बलात्काऱ्यावर कारवाई

याच महिन्यात उन्नाव सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांविरोधात कट केल्याप्रकरणी सीबीआयने भाजपचा आमदार कुलदीपसिंग सेंगरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सेंगर आणि त्याच्या मित्रांनी २०१७मध्ये आपल्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा दावा पीडित मुलीने केल्यानंतर सेंगरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -