घरमहाराष्ट्रअजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पाच वर्षांचा आमदारकीचा कार्यकाळ संपणार होता. मात्र, कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. यासंदर्भात हरिभाऊ बागडे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार यांनी आपल्या विधीमंडळ कार्यालयात येऊन आपल्या स्वीय सहाय्यकाकडे आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आपल्याला फोन करुन याबाबत माहिती दिली, असे हरिभाऊ बागडे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहेत. याशिवाय आपण अजित पवार यांच्या आमदारकीचा राजीनामा स्वीकारला असल्याचे हरिभाऊ बागडे म्हणाले. शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची माहिती हरिभाऊ बागडे यांनी दिली.


हेही वाचा – ईडीमध्ये जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब – शरद पवार

- Advertisement -

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामती विधानसभा मतदारासंघातून निवडून आले होते. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपणार होता. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचारसंहिता लागू आहे आणि त्यात बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी राजीनामा देणे ही गोष्ट धक्कादायक आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. अजित पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ७० जणांविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राज्यात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. याप्रकरणी शरद पवार शुक्रवारी दुपारी मुंबई येथील ईडी कार्यालयाला भेट देणार होते. त्यामुळे राज्यभरातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने दाखल झाले. त्यांनी दिवसभर ईडी कार्यालयाबाहेर सरकार विरोधात निदर्शने दिली. कार्यकर्त्यांचा रोष बघता ईडीने शरद पवार यांना ई-मेलद्वारे ईडी कार्यालयात न येण्याची सूचना दिली. ‘सध्या शरद पवार यांच्या चौकशीची गरज नाही. भविष्यात शरद पवार यांच्या चौकशीची गरज भासल्यास त्यांना बोलवण्यात येईल’, असे ईडीकडून सांगण्यात आले. त्यानंतर शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मागे घेतला.

- Advertisement -

याअगोदरही अजित पवार यांनी दिला होता राजीनामा

अजित पवार यांनी याअगोदरही राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारची सत्ता असताना आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. २०१२ साली सिंचन घोटाळा समोर आला होता. या घोटाळ्यात अजित पवारांचे नाव समोर आले होते. याच मुद्द्यावरुन विरोधकांकडून अजित पवारांवर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली होती. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.


हेही वाचा – शरद पवारांची चौकशी दिवाळीनंतरच; आज होणार फक्त शिष्टाचार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -