घरमहाराष्ट्रगोंदियात युतीकडून काँग्रेसला शह मिळेल का?

गोंदियात युतीकडून काँग्रेसला शह मिळेल का?

Subscribe

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होईपर्यंत या ठिकाणी चारही प्रमुख पक्ष हे वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिकेत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणे आता निश्चित झाले आहे. त्याचप्रमाणे शिवसेना-भाजप यांचीही युती होण्याची शक्यता दाट आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजप आणि शिवसेना दोघेही दावा करीत आहेत.

गोंदिया विधानसभेत काँग्रेसने १९ 62 पासून ते १990 पर्यंत सतत विजय मिळविला. पण त्यानंतर 1995 च्या निवडणुकीत काँग्रेसचा गड गडगडला. 1995 व १९९९च्या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होती आणि ही जागा शिवसेनेच्या कोट्यात होती. 1995च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रमेश कुठे यांनी काँग्रेसचे हरिहरभाई पटेल आणि 1999 च्या निवडणुकीत काँग्रेसचे अजितकुमार जैन यांचा पराभव केला होता. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४च्या निवडणुकीत सलग आमदार गोपाळदास अग्रवाल यांनी विजय मिळवला. अग्रवाल यांनी २००४ आणि २००९च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रमेश कुथेे यांचा पराभव केला आणि हिशेब चुकता केला. यानंतर २०१४च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना यांची युती तुटली.

- Advertisement -

दोन्ही पक्षांनी निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल हे भाजपचे विनोद अग्रवाल यांच्या विरोधात उभे होते. विनोद अग्रवाल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे उमेदवार राजू कुथे यांना तिसरे स्थान पटकावे लागले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. गोंदिया विधानसभेचे काँग्रेसचे विद्यमान आमदार अग्रवाल हा एकमेव चेहरा असून, शिवसेनाही भाजपकडे उमेदवारी असल्याचा दावा करत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी भाजप-शिवसेना शंभर टक्के युती होईल, असा विश्वास व्यक्त केला. गोंदिया विधानसभा शिवसेना कोट्यात जाईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -