घरमुंबईदादर-माहिम गड राखण्याचे शिवसेनेपुढे आव्हान

दादर-माहिम गड राखण्याचे शिवसेनेपुढे आव्हान

Subscribe

माहिम-दादरच्या गडाला सुरुंग लावून हा गडच काबिज करण्याचे भाजपचे मनसुबे युतीमुळे उधळले गेले. परंतु, पुन्हा एकदा मनसे हा गड मिळवण्यासाठी मैदानात उतरला आहे. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यामुळे माहीम-दादरच्या या मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार हे सेफ झोनमध्ये असल्याचे मानले जात असले तरी गेल्या काही दिवसांपासून सदा सरवणकर यांचा कौटुंबिक कारणामुळे मतदार संघात झालेला दुर्लक्ष आणि भाजप निवडणुकीत न उतल्याने आजवर मनसेचा विखुरला गेलेला मतदार पुन्हा मनसेकडे आकर्षित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संदीप देशपांडे यांच्यात काँटे की टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माहिम आणि दादर विधानसभा मतदार हा संघ एक असला तरी २००९पूर्वी हे दोन्ही मतदार संघ स्वतंत्र होते. त्यामुळे माहिममधून १९९० पासून २००९पर्यंंत सलग चार वेळा शिवसेनेचे सुरेश गंभीर हे या मतदार संघात निवडून येत होते. तर तर दादर विधानसभा मतदार संघातून१९९० ते१९९९ पर्यंत मनोहर जोशी आणि १९९९ ते २००४पर्यंत विशाखा राउुत आणि २००४ ते२००९या कालावधीत सदा सरवणकर हे सातत्याने निवडून येत आहेत. परंतु २००९नंतर माहिम आणि दादर हे दोन्ही मतदार संघ एकत्र करण्यात आले आणि या पहिल्या निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई यांनी विजय मिळवत शिवसेनेच्या ताब्यातील गड काबिज केला. परंतु २०१४च्या निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई यांचा पराभव सदा सरवणकर यांनी करत पुन्हा शिवसेनेकडे हा गड आणला. परंतु या २०१९च्या या निवडणुकीत युतीचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या विरोधात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचे आव्हान आहे.

- Advertisement -

या संपूर्ण मतदार संघाची भौगोलिक स्थिती पाहता या मतदारसंघात फारशी झोपडपट्टी परिसर नसलेल्या या विभागात इमारती आणि चाळींचा मोठा परिसर आहे.याशिवाय समुद्र किनारपट्टी लाभलेल्या या मतदार संघात हिंदू-मुस्लीम असे संमिश्र असे मतदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार न देता मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा प्रचार करत त्यांना साथ दिली होती.त्याची परतफेड करण्याचीही वेळ आलेली असून हा मतदार संघ शिवसेनेसाठी सर्वात सुरक्षित मानला जात असला कधी दगाफटका होईल हे सांगता येणार नाही.

सदा सरवणकर यांना २००९च्या निवडणुकीत याचा अनुभव आलेलाच आहे. या मतदार संघात सध्या भाजपचा एकमेव नगरसेवक असून उर्वरित सर्व नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. मात्र,मनसेचा एकही नगरसेवक नाही. परंतु नगरसेवक नसले तरी मतदार राजा आजही मनसेकडे असल्याने कोणत्याही क्षणी कुणाचेही पारडे फिरवू शकण्याची क्षमता असलेला हा मतदार संघ असल्याने आजही सदा सरवणकर विजयाची पूर्ण हमी देवू शकत नाही.

- Advertisement -

सदा सरवणकर यांना २०१४ च्या निवडणुकीत उमेदवारी न देता शिवसेनेने आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करत सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवत याच मतदार संघात सेनेच्या आदेश बांदेकर यांना तिसर्‍या स्थानावर फेकले होते. त्यातच ते पक्षाचे विभागप्रमुख आहेत.आमदार, विभागप्रमुख अशी पदे वाढत्या वयोमानापुढे सांभाळताना सरवणकर यांची दमछाक होत असली तरी त्यांनी पुन्हा या विभागातील शिवसैनिकांना एकसंध बांधले आहेत.

तर प्रतिस्पर्धी संदीप देशपांडे हे मनसेचे सरचिटणीस असून महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शक्कल लढवून निवडणूक लढवण्याची आता सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या देशपांडे यांचे सरवणकर यांना कडवे आव्हान राहणार आहे. मात्र, काँग्रेसने पुन्हा प्रविण नाईक यांना उमेदवारी दिली. परंतु, नाईक यांच्या तुलनेत ही निवडणूक सदा सरवणकर विरुध्द संदीप देशपांडे अशीच होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

माहिम-दादर विधानसभा मतदार संघातील विजयी आमदार
२००९- २०१४ :नितीन सरदेसाई-मनसे
२०१४-२०१९: सदा सरवणकर-शिवसेना

२०१४च्या निवडणुकीतील माहिम-दादर विधानसभेचा निकाल

सदा सरवणकर-शिवसेना(46,२९१ मतदान)
नितीन सरदेसाई-मनसे (४०,३५० मतदान)
विलास आंबेकर-भाजप (३३,४४६ मतदान)
प्रविण नाईक- काँग्रेस ( ११,९१७ मतदान)
रमेश परब-राष्ट्रवादी काँग्रेस (१,२११ मतदान)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -