घरमहाराष्ट्रनाशिकमराठवाड्याचा बदलला मूड; आघाडीलाही कल

मराठवाड्याचा बदलला मूड; आघाडीलाही कल

Subscribe

युतीचा बालेकिल्ला मानला जाणार्‍या मराठवाड्यात आघाडीने खिंडार पाडून युतीच्या महत्वाकांक्षेला सुरूंग लावला आहे. गेल्यावेळी युतीने ४६ पैकी २६ जागेवर २६ जागेवर भगवा गाडला होता.

तुषार माघाडे, नाशिक

युतीचा बालेकिल्ला मानला जाणार्‍या मराठवाड्यात आघाडीने खिंडार पाडून युतीच्या महत्वाकांक्षेला सुरूंग लावला आहे. गेल्यावेळी युतीने ४६ पैकी २६ जागेवर २६ जागेवर भगवा गाडला होता. प्रचारदरम्यान घडलेल्या घडमोडी, वादग्रस्त वक्तत्व, भाजप अध्यक्ष अमित शहा यांची सभेमुळे सर्व राज्याचे पंकजा मुंढे, धनयज मुंढे लढतीकडे लक्ष लागले होते. मतदारांनी धनजय मुंढेच्या पारड्यात विजयाचे दान टाकून पंकजा मुंढेना पराभूत करत भाजपच्या गडाला उद्ध्वस्त केला.

- Advertisement -

काँग्रेसचे दिवगंत नेते विलासराव देशमुख यांच्या अमित आणि धीरज या दोन्ही पुत्रांनी लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघातून विजयी प्राप्त केला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला आहे. तसेच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तब्बल १ लाख मतांनी भोकर मतदारसंघातून विजयी पताका फडकवली. 46 जागापैकी भाजप- 16, शिवसेना- 13, राष्ट्रवादी-7 , काँग्रेस-8, रासप-1, शेकापाला १ जागा मिळाली. निकालावरून मराठवाड्याचा मूड बदलेला दिसून येत असून, कोणी एका पक्षाने गृहीत धरू नये असाच संदेश मतदारांनी दिला आहे.

औरंगाबाद जिल्हा :  9 मतदारसंघ (शिवसेना-6, भाजप-3)

1. औरंगाबाद पूर्व- अतुल सावे (भाजप)
2. औरंगाबाद मध्य-प्रदीप जैस्वाल (शिवसेना)
3. औरंगाबाद पश्चिम- संजय शिरसाट (शिवसेना)
4. फुलंब्री- हरिभाऊ बागडे (भाजप)
5. सिल्लोड- अब्दुल सत्तार (शिवसेना)
6. कन्नड- उदयसिंग राजपुत (शिवसेना)
7. वैजापूर- प्रा. रमेश बोरनारे (शिवसेना)
8.गंगापूर- प्रशांत बंब (भाजप)
9. पैठण- संदीपान भुमरे (शिवसेना)

- Advertisement -

जालना जिल्हा : 5 मतदारसंघ (भाजप-3, शिवसेना-1, काँग्रेस-1)

1. जालना- कैलास गोरंट्याल (काँग्रेस)
2. परतूर- बबनराव लोणीकर (भाजप)
3. बदनापूर- नारायण कुचे (भाजप)
4. भोकरदन- संतोष दानवे (भाजप)
5. घनसावंगी – हिकमत उढाण (शिवसेना)

बीड जिल्हा : 6 मतदारसंघ (भाजप-2, राष्ट्रवादी- 4)

1.परळी : धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
2.केज : नमिता मुंदडा (भाजप)
3.माजलगाव : प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)
4.गेवराई : लक्ष्मण पवार (भाजप)
5.आष्टी : बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)
6. बीड : संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)

लातूर जिल्हा : 6 मतदारसंघ (भाजप-2, राष्ट्रवादी-2, काँग्रेस-2)

1. लातूर शहरः अमित देशमुख (काँग्रेस)
2. लातूर ग्रामीणः धीरज देशमुख (काँग्रेस)
3. औसा ः अभिमन्यू पवार (भाजप)
4. निलंगाः संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
5. उदगीरः संजय बनसोडे (राष्ट्रवादी)
6. अहमदपूरः बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)

उस्मानाबाद जिल्हाः 4 मतदारसंघ (शिवसेना-3, भाजप-1)

1.उस्मानाबादः कैलास पाटील (शिवसेना)
2. तुळजापूरः राणाजगजितसिंह पाटील (भाजप)
3. उमरगाः ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
4. परांडाः तानाजी सावंत (शिवसेना)

हिंगोली जिल्हाः 3 मतदारसंघ (भाजप-1, शिवसेना-1, राष्ट्रवादी-1)

1. हिंगोलीः तानाजी मुटकुळे (भाजप)
2.कळमनुरीः संतोष बांगर (शिवसेना)
3.वसमतः राजू नवघरे (राष्ट्रवादी)

परभणी जिल्हा : 4 मतदारसंघ-शिवसेना-1, भाजप-1, कॉग्रेस-1, रासप-1

1. परभणीः डॉ. राहूल पाटील (शिवसेना)
2. पाथरीः सुरेश वरपुडकर (काँग्रेस)
3. गंगाखेडः रत्नाकर गुट्टे (रासप)
4. जिंतूरः मेघना बोर्डीकर (भाजप)

नांदेड जिल्हा : 9 मतदारसंघ- भाजप-3, शिवसेना-1, काँग्रेस-4, शेकाप-1

1. नांदेड उत्तर : बालाजी कल्याणकर (शिवसेना)
2. नांदेड दक्षिण : मोहन हंबर्डे (काँग्रेस)
3. भोकर : अशोक चव्हाण (काँग्रेस)
4. नायगाव : राजेश पवार (भाजप)
5. देगलूर : रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)
6. मुखेड : डॉ. तुषार राठोड (भाजप)
7.हदगाव : माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस)
8. किनवट : भीमराव केराम (भाजप)
9 लोहा : श्यामसुंदर शिंदे (शेकाप)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -