घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या यात्रेदरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेदरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी बारामतीमध्ये आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे मुख्यमंत्र्यांना त्यांचं भाषण आटोपतं घ्यावं लागलं.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहेत. शनिवारी महाजनादेश यात्रा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये पोहोचली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी सुरक्षेसाठी उपस्थित पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.

- Advertisement -

‘बुरे का नतीजा बुराही होता है’

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक दिग्गज भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपबद्दल असलेला रोष यावेळी दिसून आला. यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. ‘आम्ही सगळी कामं केली असा आमचा दावाच नाही. पण यांच्या १५ वर्षांपेक्षा आम्ही ५ वर्षांमध्ये जास्त कामं केली आहेत’, असं ते म्हणाले. ‘शरद पवारांनी चूक केली म्हणून राष्ट्रवादीला गळती लागली. बुरे का नतीजा बुरा ही होता है’, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.


हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे भोसलेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण मैदानात?

भाषण घ्यावं लागलं आटोपतं

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे मुख्यमंत्र्यांना त्यांचं भाषण आटोपतं घ्यावं लागलं. यावेळी काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेले आणि बारामतीच्या इंदापूर तालुक्यामधले नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -