घरमुंबईआदित्य ठाकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे वरळीच्या मैदानात

आदित्य ठाकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे वरळीच्या मैदानात

Subscribe

शिवसेनेकडून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव वरळी विधानसभेसाठी जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही युवा उमेदवार देण्याची तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई संघटक आदिती नलावडे या वरळी विधानसभा लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच त्या उच्चशिक्षित आहेत. तसेच त्या स्वतः वरळीतच राहत असल्यामुळे त्यांचा स्थानिकांशी चांगला जनसंपर्क आहे. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीतर्फे वरळीचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र २०१४ साली शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता आदिती नलावडे या पुन्हा एकदा हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

कोण आहेत आदिती नलावडे?

खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवती संघटनेची स्थापना केल्यापासून आदिती त्यामध्ये सक्रीय आहेत. मुंबईतील अनेक प्रश्नांवर त्यांनी आजवर पक्षातर्फे आंदोलन केलेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाने त्यांच्याकडे डिजिटल प्रचाराची जबाबदारी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी मागच्यावर्षी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आदिती नलावडे यांनी थेट मातोश्री गाठत ठाकरेंना प्रतिकात्मक वाघ भेट म्हणून देण्याचे आंदोलन केले होते. त्यावेळी मातोश्रीवर जाऊन आंदोलन केल्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा झाली होती.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मातोश्री बाहेर संतप्त आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मातोश्री बाहेर संतप्त आंदोलन- उद्धव ठाकरे यांना गुडघ्याची कॅप आणि प्रतिकात्मक वाघ दिला भेटराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय Sharad Pawar यांच्याबद्दल शिवसेनेचे कार्याध्यक्ष Uddhav Thackeray यांनी संतापजनक वक्तव्य केले. या निषेधार्थ मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट ठाकरे यांच्या बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्धव ठाकरे यांना गुडघ्याची कॅप (नी कॅप) आणि प्रतिकात्मक वाघ भेट देण्यात आला.पवार साहेबांचे डोके ठिकाण्यावर आहे का असे एकवचनी वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करतो आहे. स्वतः सत्तेत आहात स्वतःला वाघ म्हणवता तुम्ही वाघ नाही तर मांजर आहात. आपण वाघ म्हणण्याच्या लायकीचे नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष Surekha Pednekar सुरेखा पेडणेकर यांनी दिली आहे. पवार साहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते असून त्यांच्याबद्दल असे बोलणे अत्यंत चुकीचे आहे. घडलेल्या घटनेची उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.आदरणीय पवार साहेबांबाबत वक्तव्य करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा मेंदू गुडघ्यात आहे, असे म्हणत राष्ट्रवादी मुंबई युवती काँग्रेसच्या अध्यक्षा Aditi Nalawde यांनी निषेध व्यक्त केला. ज्यांना एकही निवडणूक लढवता येत नाही अशांनी पवार साहेबांबाबत न बोललेलं बरं, पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावाचा मोठा वटवृक्ष उभा केला आहे तर उद्धव यांना साधी संघटना चालवता येत नाही. शिवसेना ही उद्धव ठाकरे यांना वारसा हक्कात मिळाली आहे मात्र त्यांना तीही चालवता येत नाही, असे त्या म्हणाल्या. पक्षाचे सोडा उद्धव यांना सामना नावाचा पेपरही चालवता येत नाही. मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मात्र त्याच महिलांचा अपमान सामनाच्या माध्यमातून केला गेला. आपल्या पेपरमध्ये काय छापावे, काय नाही याची अक्कल नसलेल्यांनी साहेबांबाबत न बोललेले बरे, असेही आदिती नलावडे म्हणाल्या.उद्धव ठाकरे यांचा गुडघ्यातील मेंदू शाबूत रहावा यासाठी आम्ही उद्धव यांना नी कॅप भेट देत आहोत. उद्धव ठाकरे यांच्या लाचारपणामुळे शिवसेनेचा वाघ आता मांजर झाला आहे. आम्ही शिवसेनेचे हितचिंतक आहोत, त्यामुळे त्यांचं मांजर पुन्हा वाघ व्हावं म्हणून प्रतिकात्मक वाघ भेट देत आहोत, असे त्यांनी सांगितले.#Shivsena #NCP #Protest

Nationalist Congress Party – NCP ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 14, 2018

 

- Advertisement -

वरळी विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे नेते अॅड. सुरेश माने यांना उमेदवारी दिली जाईल, अशीही चर्चा होती. वरळी विधानसभेत बीडीडी चाळ येथे बौद्ध मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सुरेश माने यांना मतांचा लाभ होऊ शकतो असा कयास राष्ट्रवादीने बांधला असण्याची शक्यता होती. मात्र पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत नाव समोर आलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -