घरमहाराष्ट्रठरलं! उद्धव ठाकरेच पुढील पाच वर्षांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार

ठरलं! उद्धव ठाकरेच पुढील पाच वर्षांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवीन वळण लागले. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार आहेत. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार असे शिवसेनेचे नेते दीपक केसरकर म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाला शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला. आज दुपारी महाविकास आघाडीच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात आहे.

भाजपचा खेळ काळीमा फासणारा – राऊत

दरम्यान, संजय राऊत यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत उद्धव ठाकरेच आता मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या पाठिंब्यावर पाच वर्षांचे मुख्यमंत्री होणार. भाजपने जो खेळ केला तो महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारा होता. तो खेळ त्यांच्यावर उलटला. त्यांना आता परत जावे लागले’, असे राऊत म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -