घरठाणेआई, बहिणीला वाचवण्यासाठी १५ वर्षीय मुलीने मारली पाण्यात उडी आणि झाली गायब!

आई, बहिणीला वाचवण्यासाठी १५ वर्षीय मुलीने मारली पाण्यात उडी आणि झाली गायब!

Subscribe

आईसोबत कपडे धुण्यासाठी खदानीवर गेलेली १५ वर्षाची मुलगी पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी दुपारी डोंबिवलीतील कोळेगाव येथे घडली आहे. मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध घेण्यात येत होता. लावण्या असे खदानीतील पाण्यात बुडालेल्या मुलीचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात मजूर राहण्यास आहे. येथील मजूर कुटुंबीय कपडे धुण्यासाठी जवळच असणाऱ्या खदानीतील पाण्याचा वापर करतात.

नक्की काय घडले?

रविवारी सकाळी येथील मजूर कुटुंबापैकी गीता ही महिला आपल्या दोन मुली परी आणि लावण्या सोबत कपडे धुण्यासाठी खदानीवर आली होती. त्यादरम्यान ४ वर्षाची परी ही खेळता खेळता खदानीच्या पाण्यात पडल्यामुळे तिला वाचवण्यासाठी आई गीताने पाण्यात उडी मारली. आई आणि बहिणीला पाण्यात बुडताना बघून लावण्या ही धावत आली आणि आई, बहिणीचे प्राण वाचवण्यासाठी पोहता येत नसतांना देखील लावण्याने पाण्यात उडी टाकली. काही वेळाने आई गीता आपल्या लहान मुलीला परीला घेऊन पाण्याबाहेर आली मात्र लावण्या पाण्याच्या बाहेर येत नसल्याचे बघून तिने मदतीसाठी हाका मारल्या.

- Advertisement -

काळोख पडल्यामुळे शोध कार्यात अडथळा

बऱ्याच वेळानी तेथील इतर मजूर मदतीसाठी धावून आले. त्यापैकी काही जणांनी लावण्याचा शोध घेऊनही ती मिळून येत नसल्यामुळे अखेर पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात लावण्यचा शोध घेतला, मात्र उशिरा पर्यंत ती सापली आली नाही. काळोख पडल्यामुळे शोध कामात अडथळा येऊ लागल्यामुळे शोध काम थांबवण्यात आले असून सोमवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात येईल, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.


हेही वाचा – अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वारासह दोघांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -