Live Update: ब्रिटनसह भारतातही पुन्हा सुरु झाल्या ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या

News Live Update
ताज्या बातम्यांचे लाईव्ह आपडेट

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता सर्व जगाचे लक्ष लागलेल्या AstraZeneca आणि Oxfordने विकसित केलेल्या लशींच्या चाचण्यांवरची बंदी उठवण्यात आली आहे. या लशीच्या मानवी चाचण्यांदरम्यान एका व्यक्तिची प्रकृती बिघडल्याने सरकारने तात्पुरती बंदी घातली होती. ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचे सांगितले आहे. या औषधाच्या चाचण्या या पूर्णपणे सुरक्षीत असल्याचे MHRAने म्हटले आहे. तसेच भारतातील या लसीची चाचणीदेखील सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात २२,०८४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०,३७,७६५ झाली आहे. राज्यात २,७९,७६८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३९१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २९ हजार ११५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.८१ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधी आणि दिग्गजांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यातून आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे कार्यालयदेखील सुटले नाही. या कार्यालयातील सहा अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्याने भुजबळ होम क्वारंटाईन झाले आहेत. (सविस्तर वाचा)


जगभरासह देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातून कोरोनावरील लस बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, मेड इन इंडिया असलेल्या भारत बायोटेक कंपनीची पहिल्या टप्प्यातील कोरोना चाचणी यशस्वीपणे पार पडली. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे Covaxin ची माकडांवर चाचणी यशस्वी झाली. भारत बायोटेक कंपनीने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. (सविस्तर वाचा)


मंत्रालयात छगन भुजबळ, डॉ. नितीन राऊत, उदय सामंत यांच्या कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील तीन मंत्र्यांची  कार्यालये तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ होम क्वॉरन्टाईन असल्याची माहिती समोर येत आहे.


अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून दिलासा

अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारने मागणी केल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून ही मंजुरी दिली असल्याचे सांगितले जात आहे. त्यासोबत स्पर्धा परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लोकल प्रवासाची मुभा असणार आहे. (सविस्तर वाता)


भारतीय वकिल देण्यास पाकिस्तानचा नकार

पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या बचावासाठी भारतीय वकील नेमण्यास पाकिस्ताने नकार दिला आहे. जाधव यांना भारतीय वकिल द्यायचा म्हणजे आमच्या कायद्यात बदल करावा लागेल, असे कारण सांगत पाकिस्तानने भारताची मागणी फेटाळली आहे. (सविस्तर वाचा)


देशात आतापर्यंत ५ कोटी ५१ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या


जगभरासह देशात कोरोनाचा कहर सुरू असून देशात कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये सलग तिसर्‍या दिवशी सर्वाधिक वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी कोरोना संसर्गाच्या नव्या रुग्ण संख्येने पुन्हा एकदा एका दिवसात सर्व विक्रम मोडले आहे. शनिवारी तब्बल ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४६ लाख ५९ हजारांहून अधिक झाली आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत ३६ लाख २४ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. (सविस्तर वाचा)


मुंबई आणि गोव्यामध्ये NCB ची रेड

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपास मोठ्या वेगाने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, NCB च्या पथकाने गोवा आणि मुंबईमध्ये ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांआधी रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB ने ही छापेमारी केली असल्याचे सांगितले जात आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात आतापर्यंत ७,१५,०२३ रुग्ण बरे

शुक्रवारी राज्यात दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९३ हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे काल १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,१५,०२३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,७१,५६६ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)