घरअर्थजगतइनोव्हा, फॉर्च्युनर खरेदी करण्याची सुवर्णसंधी; बँक ऑफ बडोदा देतेय खास ऑफर

इनोव्हा, फॉर्च्युनर खरेदी करण्याची सुवर्णसंधी; बँक ऑफ बडोदा देतेय खास ऑफर

Subscribe

टोयोटा (Toyota)ची इनोव्हा (Innova) किंवा फॉर्च्युनर (Fortuner) गाडी घ्यायची असेल तर बँक ऑफ बडोदाने खास ऑफर आणली आहे. बँक ऑफ बडोदाने टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) सोबत करार केला आहे. हा करार ग्राहक आणि विक्रेत्यांना वित्तपुरवठा पर्याय प्रदान करण्यासाठी आहे. बॅंकेने निवेदनात म्हटलं आहे की, टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या संपूर्ण वाहनांच्या विक्री दरम्यान वित्तपुरवठा करणार्‍या प्राधान्य पर्यायात बँक ऑफ बडोदाचा समावेश केला जाईल.

या नव्या सेवेत ग्राहकांना वाहनाच्या किंमतीच्या ९० टक्के किंमतीपर्यंत फायनान्स करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय, ८४ महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी मिळेल. अकाली पेमेंट आणि इतर शुल्क देखील यात लागू होणार नाहीत.

- Advertisement -

ग्राहकांना मिळणार चांगल्या सेवा

बँकेला किरकोळ वाहन कर्जाच्या बाजारपेठेत विस्तार करण्यास मदत होईल, असं बँक ऑफ बडोद्याचे कार्यकारी संचालक विक्रमादित्यसिंग खिची यांनी सांगितलं. यामुळे आम्हाला आणि टोयोटा ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा मिळण्यास मदत होईल. ही भागीदारी डीलर फायनान्स प्रोग्रामच्या माध्यमातून MSME सेगमेंट आणि ऑटो लोन फायनान्ससह रिटेल सेगमेंटला प्रोत्साहन देईल. त्याचबरोबर डीलर्सना अन्य बँक उत्पादने क्रॉस सेल करण्याचीही संधी दिली जाईल.

टाटा मोटर्स आणि एचडीएफसी बँकेनेही केलाय करार

अलिकडेच टाटा मोटर्सने प्रवासी गाड्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी एचडीएफसी बँकेबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत कंपनीने दोन योजना सुरू केल्या आहेत. एक म्हणजे Gradual Step Up Scheme आणि दुसरी TML Flexi Drive Scheme.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ; पोट भरण्यासाठी खातायत उंदीर आणि साप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -