घरअर्थजगत‘टॅप अँड गो’ कॉन्टॅक्टलेस पेमेंट: कोरोनामुळे एसटी होणार आता कॅशलेस

‘टॅप अँड गो’ कॉन्टॅक्टलेस पेमेंट: कोरोनामुळे एसटी होणार आता कॅशलेस

Subscribe

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिवहण विभागाने अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाने एसटीला कॅशलेश करण्यासाठी स्मार्ट कॉर्ड योजना आणली आहे. तसेच फिनो पेमेंट्स बँकेच्या (Fino Payments Bank) मदतीने एनएफसी-आधारित ‘टॅप अँड गो’ कॉन्टॅक्टलेस पेमेंट सोल्यूशनच्या मदतीने कॅशलेस पद्धतीने प्रवाशांना एसटीचा प्रवास करता येणार आहे. आतापर्यंत फिनो पेमेंट्स बॅकेच्या मदतीने ३ लाख एनएफसी सक्षम स्मार्ट कार्ड प्रवाशांना दिले आहेत.

कोविड १९ प्रादुर्भावाच्या दिवसांमध्ये एसटी महामंडळाच्या बसेस दररोज मोठया संख्येने प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे तिकीट घेत असताना पैशांची देवाणघेवाण होत असते. या माध्यमातून सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. परिणामी या धोक्याला कमी करण्यासाठी आणि डिजिटल व्यवहाराला चालणा देण्यासाठी एसटी महामंडळाने फिनो पेमेंट्स बँकेच्या मदत घेतली आहे. फिनटेक पार्टनरच्या सहयोगाने रोख डिजिटलायझेशनवर लक्ष केंद्रित करणारी नवीन बँक असलेल्या फिनो पेमेंट्स बँकने मास ट्रान्झीट सिस्टम विशेषत: राज्य बस परिवहन सेवांसाठी एनएफसी-आधारित कॉन्टॅक्टलेस पेमेंट सोल्यूशन सादर केले आहे.

- Advertisement -

ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील बहुतांश लोकांची एसटीच्या प्रवासाला सर्वाधिक पसंती आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान सध्या तिकीट खरेदी करण्यासाठी रोख रक्कम वापरली जाते. मात्र, आता प्रवाशांना स्मार्ट कार्डमध्ये रिचार्ज केल्यानंतर कॅशलेस पद्धतीने तिकीट मिळणार आहे. एसटी महामंडळाचे संचालक शेखर चन्ने यांनी दैनिक आपलं महानगरला सांगितले की, एसटी महामंडळात स्मार्ट कार्ड योजना सुरू आहे. त्यामध्ये स्मार्ट कार्डमध्ये प्रवाशांना रिचार्जसुद्धा करता येणार आहे. फिनो पेमेंट बँकेच्या मार्फतच हे रिचार्ज केले जात आहे. त्यामुळे कॅशलेस पद्धतीने प्रवाशांना तिकीट खरेदी करता येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना होणार फायदा

कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स वापरुन सार्वजनिक बस तिकीट प्रणालीचे ग्राहक डिजिटल वित्तीय सेवेत बदल घडवून आणणे शक्य आहे. याचा फायदा विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना होईल, अशी आशा आहे. फिनो पेमेंट्स बँकेने मास ट्रान्झिट सिस्टमसाठी कॉन्टॅक्टलेस पेमेंट सोल्यूशन विकसित करण्यासाठी सिटी कॅश सारख्या फिनटेक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. यापूर्वी, फिनो पेमेन्टस बँकेच्या प्रवर्तक फिनो पायटेकने फिन्टेक इकोसिस्टमद्वारे सिटी कॅशमध्ये गुंतवणूक केली होती.

- Advertisement -

स्मार्ट कार्ड सोल्यूशन

एनएफसी-आधारित प्रीपेड स्मार्ट कार्ड सोल्यूशनचा वापर ऑफलाइन भाडे संकलनासाठी देखील केला जाऊ शकतो, जो कनेक्टिव्हिटीच्या समस्या असलेल्या ठिकाणी फायदेशीर आहे. स्वत: च्या बस डेपोसह, एसआरटीसी फिनोच्या राज्य व्यापी बँकिंग नेटवर्कचा टच पॉईंट म्हणून लाभ घेऊ शकतात. जिथे ग्राहकांना स्मार्ट आणि कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा प्रकारे रीचार्ज करण्याची सुविधा आहे. रोखीचे डिजिटलीकरण झाल्यामुळे कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट्स मुख्यत्वे रोख आधारावर असलेल्या व्यवसायांचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यास मदत करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -