घरट्रेंडिंगसायकल दुरुस्तीला उशीर झाला, लहान मुलांनी थेट पोलीस स्थानक गाठलं

सायकल दुरुस्तीला उशीर झाला, लहान मुलांनी थेट पोलीस स्थानक गाठलं

Subscribe

केरळमध्ये राहणाऱ्या एका १० वर्षीय मुलानं दुरुस्तीसाठी दिलेली सायकल वेळेवर मिळत नसल्याची तक्रार थेट पोलिसांमध्ये केली...

पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारी या खून, मारामारी, चोरी अशा प्रकारच्या असतात. मात्र केरळ पोलिसांकडे २५ नोव्हेंबर रोजी एक वेगळ्याच प्रकारची तक्रार दाखल झाली. एका पाचवीतल्या विद्यार्थ्याने स्वहस्ताक्षराने पत्र लिहून ही तक्रार केरळच्या मेप्पायर पोलिस स्थानकातील पोलिसांना दिली. ज्या मुलानं हे पत्र लिहीलं त्याचं नाव अबिन असून तो विलायटूर एलामपिलाड एलपी स्कूलचा इयत्ता पाचवीतला विद्यार्थी आहे. एका सायकल दुरुस्तीच्या दुकानानं त्याच्या आणि त्याच्या भावाच्या सायकलच्या दुरुस्तीला २ महिन्यांचा विलंब लावला आहे. त्यांची सायकल लवकर दुरुस्त करण्यासाठी पोलिसांनी दखल घ्यावी, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

पत्रात लिहिल्याप्रमाणे अबिन आणि त्याच्या भावानं ५ सप्टेंबर रोजी आपली सायकल दुरुस्ती करीता दिली होती. मात्र अद्यापही त्यांची सायकल दुरुस्त करुन मिळालेली नाही. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली असून सायकल लवकरात लवकर दुरुस्त करुन दोघा भावांना देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

‘आम्ही ५ सप्टेंबर रोजी आमची सायकल दुरु्स्तीला दिली होती. पण ती अजून आम्हाला परत मिळालेली नाही. दुकानदारानं आमच्याकडून दुरुस्तीसाठी २०० रुपये आगाऊ घेतले. जेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते फोन उचलत नाही किंवा आम्हाला सांगतात सायकल लवकर दुरुस्त होईल. आम्ही दुकानात देखील गेलो, मात्र दुकान बंद असल्यामुळे आम्हाल परत यावं लागतं’

– अबिननं पत्रात लिहीलं.

- Advertisement -

पुढे अबिननं पत्रात हे देखील लिहीलंय की, त्यांच्या घरात कोणी मोठी व्यक्ती नाही जी दुकानात जाऊन याबाबत चौकशी करु शकतील. म्हणून त्यांनी थेट पोलिसांना पत्र लिहीलं. पोलिसांनाही ही गोष्ट फार आवडली की एका दहा वर्षांच्या मुलाने त्याची तक्रार नोंदवायला थेट पोलीस स्थानक गाठले. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत थेट सायकल दुरुस्तीच्या दुकानात चौकशी केली. तेव्हा त्यांना समजलं की दुकानदार आजारी असल्यामुळे आणि त्याच्या मुलाचं लग्न असल्यामुळे दुकान बंद होतं. २८ नोव्हेंबर पर्यंत सायकल दुरुस्त करून देणार असं दुकानदाराने आश्वस्त केलं.

काही दिवसांनी अबिन आणि त्याच्या भावाला सायकल दुरुस्त करुन मिळाली. केरळ पोलिसांनी आपल्या फेसबुकवर दोन्ही भावांचा सायकल सोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

- Advertisement -

Kerala Police ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ನವೆಂಬರ್ 27, 2019

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -