घरदेश-विदेशगुजरात : अपहरण करुन १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

गुजरात : अपहरण करुन १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

Subscribe

देशात काही केल्या बलात्काराच्या घटना कमी होताना दिसत नाही. हैदराबाद बलात्कार प्रकरण ताजे असतानाच दररोज देशातील विविध भागांमध्ये बलात्काराच्या घटना समोर येत आहेतय. अशीच एक घटना गुजरातमध्ये देखील घडली आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील चार इसमांनी चार महिन्यांपूर्वी राजस्थानच्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते आणि बनासकांठा येथील शेतातील एका झोपडीत तिला कैद करुन ठेवले होते. तिथे तिच्यावर गेल्या चार महिन्यांपासून वारंवार बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींपैकी एकाला अटक केली आहे.


हेही वाचा – हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपींचे एन्काऊंटर

- Advertisement -

अशाप्रकारे घटना आली उघडकीस 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या दुनगारपूर येथून एका इसमाने पीडितेचे ऑगस्ट महिन्यात अपहरण केले. त्या इसमाने पीडितेवर बलात्कार केला आणि त्यानंतर वैद्य कोळी या इसमाकडे पीडितेला सोपवले. वैद्य कोळीने पीडितेला गुजरातच्या बनासकांठा येथील एका शेतातील झोपडीत बंदीस्त केले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महेश कोळी याने देखील तिच्यावर बलात्कार केला. पीडितेला ज्या शेतातील झोपडीत बंदीस्त करण्यात आले होते. याबाबत शेतमालकाला काहीच माहिती नव्हती. मात्र, जेव्हा शेतमालकाच्या निदर्शनास पीडित तरुणी आली तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार केली. सुरुवातीला आरोपींनी कामासाठी ती मुलगी आली असल्याचे भासवले. मात्र, शेतमालकाने आपल्याला याप्रकरणी संशय असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी केली आणि सगळा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -