घरदेश-विदेशहिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा आणि बर्फवृष्टीचा कहर; १४ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा आणि बर्फवृष्टीचा कहर; १४ जणांचा मृत्यू

Subscribe

हिमाचलप्रदेश मुसळधार पाऊस आणि बर्फबृष्टीने कहर केला आहे. हिमाचलप्रदेशमध्ये जलप्रलय आला असून आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ट्रेकिंगसाठी गेलेले ४५ जण बेपत्ता झाले आहेत.

हिमाचलप्रदेशाला मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीने झोडपून काढले आहे. सध्या हिमाचलप्रदेशमध्ये जलप्रलय आला आहे. हिमाचलप्रदेशसह पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसह अनेक उत्तर भारतातील अनेक भागामध्ये पूरस्थिती आहे. यामुळे त्याठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचलप्रदेशमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हिमाचलप्रदेशमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे ट्रेकिंगला गेलेले आयआयटीचे ३५ विद्यार्थ्यांसह ४५ जण बेपत्ता झाले होते मात्र ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सर्व विद्यार्थी हम्पता येथे ट्रेकिंगला गेले होते त्याठिकाणावरुन त्यांना मनालीला जायचे होते मात्र ते बेपत्ता झाले होते. सध्या लाहौल आणि स्पिती जिल्ह्यामधील सिस्सू येथे ते सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

बेपत्ता झालेले ८ ट्रेकर्स सुरक्षित

लाहौल आणि स्पिती जिल्ह्यामध्ये ८ जण बेपत्ता झाले होते. हे आठ जण देखील ट्रेकिंगसाठी गेले होते. यामध्ये ब्रुनेईची एक महिला संजिता तुबा, नेदरलँडचे एबी लिम आणि ६ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या ८ ट्रेकर्समधील प्रियंका वोरा, पायल देसाई, दीपिका, दिव्या अग्रवाल, अभिनव चंदेल आणि अशोक बेपत्ता झाले होते. लाहौल आणि स्पिती भागामध्ये ते ट्रेकिंगसाठी गेले होते. दरम्यान आलेल्या माहितीनुसार हे सर्व ८ ट्रेकर्स सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील कोकसर कॅम्प याठिकाणी सुरक्षित असल्याचे एसडीएम अमर सिंग नेगी यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

जनजीवन पूर्णत: विस्कळीत

हिमाचल प्रदेशमध्ये तुफान पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. कांगडा जिल्ह्यातील व्यास नदीवर असलेल्या पोंग धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊ शकतात. व्यास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचलप्रदेशच्या अनेक भागामध्ये पूर आला आहे. कुल्लू जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि पूरामुळे घरांचे आणि गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून जवजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

हिमाचलप्रदेशमध्ये १४ जणांचा मृत्यू

कुल्लू, कांगडा आणि चंबा जिल्ह्यामध्ये पावसामुळे झालेल्या अनेक घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कुल्लूमध्ये देखील एका मुलीसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे आलेल्या पुरामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. पांगी गावामध्ये पूरामध्ये गाडी वाहून गेल्याने गाडीमधून २ जणांचा मृत्यू झाला आहे. कांगडा जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता हिमाचलप्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारपासून अनेक भागामध्ये हाय अलर्ट दिला आहे. तर अनेक भागामध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या. कांगडा, कुल्लू आणि हमीरपूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी शाळांना सुट्टी देण्यात आली. हिमाचलप्रदेशमध्ये आतापर्यंत २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हिमाचलप्रदेशमधील १२ पैकी १० जिल्ह्ये प्रभावित झाले आहेत. भूस्खलनामुळे ३७८ रस्त्ये बंद झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -