घरदेश-विदेशआता रेल्वे फलाटावरील बुक स्टॉल्सवरही मिळणार खाद्य आणि औषधे

आता रेल्वे फलाटावरील बुक स्टॉल्सवरही मिळणार खाद्य आणि औषधे

Subscribe

येत्या काळात रेल्वे फलाटावरील बुक स्टॉलवर औषधे आणि खाद्य पदार्थ उपलब्ध होणार आहेत. फलाटावरील स्टॉलची संख्या कमी नकरता हे बदल करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन कार्यशील असते. मात्र देशाची प्रवासी संख्या बघता रेल्वे प्रशासन प्रवाशांची गरज भागवण्यासाठी अशस्वी ठरले असल्याचे चित्र दिसत आहे. नुकतीच व्हायरल झालेली लिंबू पाणी बनवण्याच्या क्लिपमुळे रेल्वे फलाटावर मिळणाऱ्या अन्नावर प्रश्नचिन्ह पुन्हा उपस्थित करण्यात आला आहे. याघटनेला काही दिवसच उलटून गेले असतानाच रेल्वे प्रशासनाने नवीन निर्णय घेतला आहे. या निर्णया अंतर्गत रेल्वे फलाटावर  असलेली ए एच व्हिलर बुक स्टॉल्सला “मल्टी पर्पज स्टाल्स” बनवण्यात येणार आहेत. या स्टॉल्सवर पुस्तकांबरोबरच खाद्य पदार्थ आणि औषधीही प्रवाशांना मिळणार आहेत. फलाटावरील पहिल्या क्रमांकावर असलेल्या या स्टॉल्सवर ही सुविधा सुरु करण्यात येणार आहेत.

रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय

रेल्वे बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार बुक्स स्टॉल्सवर खाद्य पदार्थ आणि औषधांची सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही सेवा हळूहळू लागू करण्यात येणार आहे. सुरवातील एका विभागात पाच स्टॉल्सवर ही सेवा सुरु केली जाणार आहे. ए एच व्हिलरचे मध्य रेल्वेच्या १८ विभागात आणि एकूण देशात ९०० स्टॉल्सआहेत या स्टॉल्सवर ही सुविधा सुरु केली जाणार आहे. स्टॉल्सची संख्या कमी न करता ही सुविधा सुरु केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -