Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर देश-विदेश कंगनाच्या मनालीतील घरावर गोळीबार; म्हणाली, ‘मला घाबरवण्याचा होतोय प्रयत्न’!

कंगनाच्या मनालीतील घरावर गोळीबार; म्हणाली, ‘मला घाबरवण्याचा होतोय प्रयत्न’!

Mumbai
kangana-ranaut
कंगना राणौत (सौजन्य - न्यूजफॉलो)

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मनाली येथील घरावर गोळीबार झाल्याचे समजते. याप्रकरणी कंगना रनौतच्या टीमने शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसात तक्रार दाखल केली. तिच्या मनालीच्या घराजवळ गोळीबार झाल्याचे आवाज ऐकू आल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर कुलू पोलिसांनी कंगनाच्या घरी जाऊन प्राथमिक तपास केला. दरम्यान, पोलिसांना अद्यापतरी कोणता सुगावा लागलेला नाही. मात्र पोलिसांनी कंगनाच्या मनाली येथील घरावर सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. यासंबंधी, हा तर मला घाबरवण्याचा प्रयत्न असल्याचे कंगनाने म्हटले आहे.

नेमके काय घडले

कंगनाने याबाबत माहिती दिली की, मी माझ्या बेडरुममध्ये होते. रात्रीचे साधारण साडेअकरा वाजले होते. मला फटाक्यांसारखा आवाज ऐकू आला. आधी मला वाटले की कोणीतरी फटाकेच फोडले असावेत. परंतू जेव्हा दुसऱ्यांदा तसाच आवाज आला तेव्हा मी सावध झाले. हा गोळीचा आवाज होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनालीमध्ये पर्यटकदेखील नाहीत. त्यामुळे फटाके कोण आणि का फोडेल. त्यामुळे मी त्वरीत सुरक्षा रक्षकांना बोलावले. मी जेव्हा त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, काही मुलांनी हा खट्याळपणा केला असावा. त्या सुरक्षा रक्षकांनाही गोळीचा आवाज ऐकू आला नसावा. त्यावेळी घराबाहेर कोणीच नव्हते. आम्ही घरामध्ये ५ जण होतो. नंतर आम्ही पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

हेही वाचा –

नागपूर: बेला येथील साखर कारखान्यात स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here