घरदेश-विदेशअॅपल करणार फेसबुकच्या वेब ट्रॅकिंग टूलची कोंडी

अॅपल करणार फेसबुकच्या वेब ट्रॅकिंग टूलची कोंडी

Subscribe

फेसबुकवरचा तुमचा डेटा लीक होऊ नये, यासाठी अॅपलने काही पावलं उचलली आहेत. अॅपलची उत्पादने वापरणाऱ्याच्या मोबाईलमधील किंवा आयपॅडमधील डेटा फेसबुककडून वापरला जाऊ नये, यासाठी तंत्रज्ञानाच्या साह्याने एक प्रकारे डेटाची नाकाबंदी करण्याचे अॅपलने निश्चित केले आहे. अॅपलची सॉफ्टवेअर प्रणाली आयओएसच्या सुधारित आवृत्तीमध्ये हे बदल करण्यात आले असून, यामुळे कदाचित या दोन्ही दिग्गज कंपन्यांमध्ये भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

फेसबुककडून गोपनीयतेचा भंग – अॅपल

‘बीबीसी’च्या वृत्तानुसार, अॅपलचे सॉफ्टवेअर प्रमुख क्रेग फेडेरिघी यांनी कॅलिफोर्निया येथे झालेल्या कंपनीच्या डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये या सुधारणांसंबंधीची घोषणा केली. त्यांनी सांगितले की अॅपलच्या सफारी या वेब ब्राऊजरच्या साह्याने यापुढे सोशल नेटवर्क वेबसाईट्सकडून वापरकर्त्याच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष परवानगी मागावी लागेल.
अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी यापूर्वीच फेसबुककडून गोपनीयतेचा भंग होत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झकरबर्ग याने ही वायफळ बडबड असल्याचे म्हणत त्यांच्या वक्तव्याचे खंडन केले होते.

- Advertisement -

तुम्ही माहिती गोपनीय ठेऊ शकता

वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फेडेरिघी असेही म्हणाले की, फेसबुक अशापद्धतीने वापरकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो ज्याची त्यांना कदाचित माहितीही नसेल. आपण फेसबुकवर लाईक, शेअर व कमेंटची जी बटणे पाहतो ती वापरली नाहीत तरी वापरकर्त्यांची माहिती ट्रॅक करण्यास मदत करतात, असेही ते म्हणाले. त्यांनी यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या अलर्टकडे लक्ष वेधले. त्यात असा प्रश्न होता की ‘तुम्ही फेसबुक डॉट कॉमला कुकीज तसेच उपलब्ध माहिती वापरण्याची परवानगी देता का? ‘तसेच ‘तुम्ही तुमची माहिती गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेऊ शकता’ असाही संदेश स्क्रीनवर येत असल्याचे त्यांनी दाखवले.

सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी या निर्णयाचे कौतुक केले. ब्राउजरकडून कशाप्रकारचे काम अपेक्षित आहे, याबाबत फार सखोल प्रयत्न आणि बदल अॅपलतर्फे केले जात आहेत. अर्थात जेवढे सखोल बदल करता येतील तितकीच गोपनीयता जपता येईल, असे मत केव्हीन ब्युमॉंट यांनी व्यक्त केले. सहसा कंपन्यांकडून धोरणांमध्ये जे बदल केले जातात ते अगदीच नगण्य असतात व त्यामुळे या क्षेत्रात थोडा फरक पडतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -