अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण

New Delhi
arun jaitley sushma swaraj and george fernandes conferred with padma vibhushan award
अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण घोषित

केंद्र सरकारच्या वतीने आज पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला आहे. तसंच खासदार मेरी कोम यांच्यासह , छन्नुलाल मिश्रा, अनेरूद जुगुनाथ जीसीएसके, विश्वेतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा मठ उडुपी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मविभूषण पुरस्कार यादी 

यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण जाहीर करण्यात आला असून. भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू, तर उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील पद्मभूषण जाहीर करण्यात आला आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी मुमताज अली, सय्यद मुझीम अली (मरणोत्तर), मुझफ्फर हुसेन बेग, कला क्षेत्रातील कार्यासाठी अजोय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोशी, क्रिष्णम्मल जगन्नाथन, एस. सी. जमीर, अनिल प्रकाश जोशी, डॉ. त्सेरिंग लंडोल,  निळकांता रामकृष्णा माधवा मेनन (मरणोत्तर), जगदीश शेठ, वेणू श्रीनिवासन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.


हेही वाचा – पद्म पुरस्कार घोषणा; बीजमात राहीबाई पोपेरे आणि पोपटराव पवार यांना पद्मश्री