घरदेश-विदेशगोवा राज्यात भाजपसमोर आहे 'हा' मोठा प्रश्न

गोवा राज्यात भाजपसमोर आहे ‘हा’ मोठा प्रश्न

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पदभार सांभाळू शकत नाहीत. दरम्यान विरोधी पक्षाला दाबण्यासाठी भाजपा नवीन मुख्यमंत्री शोधत असल्याची चर्चा आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे काल रात्री भाजपा आमदारांची बैठक झाली. गोव्यातील भाजप आमदारांना राज्याबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्याला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पर्रिकरांची प्रकृती गंभीर असल्यामुळे नवीन सरकार बनवण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. काँग्रेसने राज्यपालांना याबाबत पत्र लिहिले आहे. दरम्यान भाजपने आपली सत्ता सावरण्यासाठी मुख्यमंत्री पदावर नवीन उमेदवाराला बसवण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यात भाजपाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अन्य तीन अपक्ष उमेदवारांशी युती केली होती.

गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनी पर्रिकर यांची प्रकृतीत बिघाड होत असल्याचे सांगितले. “जोपर्यंत पर्रिकर आहेत तो पर्यंत आमचे समर्थन त्यांनाच राहणार. काही नवीन बनवण्याची गरज नाही भारतीय जनता पक्षाने जर काही निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या बरोबर असणार”, असे सरदेसाई यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -