घरदेश-विदेशशेतकऱ्यांना पाठिंबा देत आमदाराने खरा केला शब्द, विधानसभा अध्यक्षांकडे केला राजीनामा सुपुर्द

शेतकऱ्यांना पाठिंबा देत आमदाराने खरा केला शब्द, विधानसभा अध्यक्षांकडे केला राजीनामा सुपुर्द

Subscribe

केंद्राच्या नव्या कृषी विधेयकांना विरोध करत इंडियन नॅशनल लोकदल (INDL) चे नेता अभय सिंह चौटाला यांनी हरियाणा विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नव्या कृषी विधेयकांवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी आपला राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द केला आहे. त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्विकारला आहे. चंदीगढ येथे जाऊन त्यांनी आपला राजीनामा अध्यक्षांकडे दिला आहे. अभय सिंह चौटाला यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन देत घोषणा केली होती की, जर २६ जानेवारीपर्यंत केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे मागे घेतले नाही तर ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील. पण केंद्र सरकारमार्फत कृषी कायदे मागे घेण्यात आले नाहीत. म्हणूनच त्यांनी थेट चंढीगढ गाठले. हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांना भेटण्यासाठी ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत चंदीगढला पोहचले आणि आपला राजीनामा दिला. अध्यक्षांनीही त्यांचा हा राजीनामा स्विकारला आहे.

अभय सिंह चौटाला हे हरियाणातील एलनाबाद या विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री देवीलाल यांचे नातू आणि ओम प्रकाश चौटाला यांचा छोटा मुलगा आहेत अभय सिंह चौटाला. शिक्षक भरतीमध्ये घोटाळ्यानंतर ओमप्रकाश चौटाला यांना कारावासाची शिक्षा झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा अजय चौटाला यांनी जननायक जनता पार्टीची स्थापना केली. त्यानंतर आयएनएलडीचे नेतृत्व अभय चौटाला हेच करत आहेत. हरियाणातील एलनाबाद येथून अभय चौटाला हे गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.

- Advertisement -

राजीनामा दिल्यानंतर अभय चौटाला यांनी आपल्या आजोबांची आठवण काढली. अभय चौटाला म्हणाले की, माझ्यात आजोबा देवीलाल यांचे रक्त आहे. त्यांनी नेहमीच शेतकरी, मजदुरांच्या हितासाठीचे राजकारण केले. त्यांचीच प्रेरणा घेऊन मी खुर्चीला लाथ मारली. मी तर फक्त आमदारकी पद सोडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


 

- Advertisement -

 

 

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -