घरदेश-विदेशपाच पत्नींच्या खर्चासाठी 'त्याने' ५० महिलांना फसवले!

पाच पत्नींच्या खर्चासाठी ‘त्याने’ ५० महिलांना फसवले!

Subscribe

काही माणसं राज्य सरकार संचलित हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम मिळवून देण्याचे प्रलोभन देत महिलांना फसवत असल्याची तक्रार मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली होती.

भोपाळ मधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये नोकरीला लावण्याचे आमिष देऊन मध्य प्रदेशमधील टोळीने ५० महिलांना फसवल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने या टोळीला अटक केली आहे. या टोळीतील एका आरोपीने त्याच्या ५ पत्नींचा खर्च भागविण्यासाठी हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान काही माणसं राज्य सरकार संचलित हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम मिळवून देण्याचे प्रलोभन देत महिलांना फसवत असल्याची तक्रार मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर हे प्रकरण स्पेशल टास्क फोर्सकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी टोळीच्या म्होरक्यासह एकाला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास करुन स्पेशल टास्क फोर्सने या टोळीचा म्होरक्या दिलशाद खान (रा. जबलपूर) आणि त्याचा साथीदार अलोक कुमार (रा. भोपाळ) यांना अटक केली आहे. स्पेशल टास्क फोर्सचे अशोक अवस्थी म्हणाले की, “एआयआयएमएस (AIIMS) भोपाळ मध्ये नर्स म्हणून कामाला लावण्याचे प्रलोभन देत दोघांनी आतापर्यंत ५० महिलांना लुबाडले आहे.”

- Advertisement -

पत्नींची चौकशी होणार

अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली. या चौकशीत आरोपी दिलशाद खानला ५ पत्नी असल्याची माहिती समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नींचा खर्च भागवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे. दिलशादच्या ५ पत्नींपैकी एक पत्नी जबलपूरमध्ये खाजगी क्लिनीक चालवते. तर दुसरा आरोपी अलोक कुमारची पत्नी सरकारी मुलींच्या वसतीगृहात अधिक्षक म्हणून काम करते. दरम्यान या दोघींचीही या प्रकरणात काय भूमिका होती का? याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -