घरदेश-विदेशभाजप सरकारला झटका; भूपेन हजारिकांचे कुटुंब 'भारतरत्न' परत करणार

भाजप सरकारला झटका; भूपेन हजारिकांचे कुटुंब ‘भारतरत्न’ परत करणार

Subscribe

आसामचे प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांच्या कुटुंबाने त्यांना मिळालेला भारतरत्न हा पुरस्कार परत देण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने २५ जानेवारी रोजी भूपेन हजारिका यांना भारतरत्न पुरस्कार बहाल केला होता. नागरिकता विधेयकाच्या विरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी हा पुरस्कार परत करत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. नागरिकता दुरुस्ती विधयेकाला शिवसेनेने देखील विरोध केलेला आहे. राज्यसभेत हे विधेयक सादर केल्यानंतर त्याला विरोध करु, असे काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे हजारिका यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नागरिकता दुरुस्ती विधेयकामुळे आसाममध्ये अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आतापर्यंत अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. नुकतेच गुवाहटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, हजारिका यांना भारतरत्नाचा मान फार पुर्वीच मिळायला हवा होता. तसेच नागरिकता दुरुस्ती विधेयकाबाबत काही लोक जाणूनबुजून संभ्रम पकरवत आहेत. आमचे सरकार आसाम आणि पुर्वेकडील राज्यांची संस्कृती, भाषा आणि साधन संपत्तीचे रक्षण करण्याची भूमिका बजावत आहे.

- Advertisement -

कोण होते भूपेन हजारिका?

भूपेन हजारिका हे आसामचे प्रसिद्ध गीतकार, संगीतकार, गायक, कवी आणि चित्रपट निर्माते होते. त्यांनी आसाम आणि पुर्वेकडील राज्यांच्या संस्कृती आणि लोक संगीताला सिनेमाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सादर केले होते. हजारिका यांना १९७५ साली सर्वोकृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तसेच आतापर्यंत त्यांना पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

नागरिकता दुरुस्ती विधेयक काय आहे?

नागरिकता दुरुस्ती विधेयक २०१६ या अंतर्गत पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेश इथून आलेल्या बिगर मुस्लिम अल्पसंख्याक्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -