घरक्रीडाकरोना इफेक्ट; कॅनडाची ऑलिम्पिक मधून माघार

करोना इफेक्ट; कॅनडाची ऑलिम्पिक मधून माघार

Subscribe

ब्राझील आणि नॉर्वे या देशांनी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

कोविड १९ या जागतिक महामारीचा आता येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांवरही परिणाम होऊ लागला आहे. या स्पर्धेतून कॅनडाने माघार घेतली आहे. या स्पर्धेसाठी जगातून स्पर्धक येणार असल्यामुळे तिथे आमच्या खेळाडूंना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने आम्ही तूर्तास समर ऑलिम्पिक २०२०ला खेळाडू न पाठवण्याचा निर्णय घेतला असून टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकबाबतही आमचा असाच विचार असू शकतो, असे कॅनेडियन ऑलिम्पिक कमिटी आणि कॅनेडियन पॅरा ऑलिम्पिक कमिटीने म्हटले आहे.


हेही वाचा – Coronavirus: आयपीएल आणखी लांबणीवर?

दरम्यान, असा निर्णय घेणारा हा पहिला देश आहे. कॅनेडियन ऑलिम्पिक कमिटीने टोकियो येथे जुलै २४ ते ऑगस्ट ९ दरम्यान होणारी ऑलिम्पिक स्पर्धाही पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ब्राझील आणि नॉर्वे या देशांनीही हीच मागणी केली असून त्यांच्याही ऑलिम्पिक कमिटीने समर ऑलिम्पिकला खेळाडू न पाठवण्याबाबत निर्णय घेण्याची विनंती त्यांच्या सरकारला केली आहे. त्याचबरोबर आता अमेरिका ऑलिम्पिक कमिटीदेखील असाच निर्णय घेण्याच्या विचारात असून त्यांनीही टोकियो येथे होणारी ऑलिम्पिक स्पर्धादेखील पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे समर ऑलिम्पिक २०२० आणि टोकियो ऑलिम्पिक २०२० या दोन्ही स्पर्धांवर करोनाचे सावट गडद बनत चालले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -