घरCORONA UPDATEशहरातून परतलेल्या मजुरांना बिहार सरकारने घरी जाण्यापुर्वी कंडोम वाटले

शहरातून परतलेल्या मजुरांना बिहार सरकारने घरी जाण्यापुर्वी कंडोम वाटले

Subscribe

लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कंडोमचे वाटण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसच्या भीतीने शहरांमधून परतलेल्या स्थलांतरीत मजुरांचा क्वारंटाईन पिरीयड संपल्यानंतर बिहारमधील मजुर आता आपल्या घरी जाण्यासाठी तयार झाले आहेत. या मजुरांना बिहारच्या आरोग्य विभागाकडून घरी जाण्यापूर्वी कंडोमचे वाटप करण्यात आले आहे. नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी हा पर्याय स्वीकारला असल्याचे बिहार राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. सध्या बिहारच्या क्वारंटाईन सेंटरमधून ८ लाख ७७ हजार मजूर घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर ५ लाख ३० हजार मजूर अजूनही जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत.

एका वृत्तसंस्थेला बिहारच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी यासंबंधी प्रतिक्रिया दिली. “स्थलांतरीत मजूर आता १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पुर्ण करुन घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. याकाळात नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी आम्ही त्यांना कंडोम देत आहोत. ज्यामुळे त्यांची मदतच होणार आहे. कंडोमसोबतच मजुरांना कुटुंब नियोजनाबाबत मार्गदर्शनही करण्यात आले आहे.”

- Advertisement -

बिहारमधील गोपालगंज, जमुई, समस्तीपूर, सुपौल, सारन, रोहतास आणि पूर्व चंपारण या जिल्ह्यांमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये कंडोम वाटायला सुरुवात झाली आहे. यासोबतच आशा आरोग्य मदतनीस आणि सहाय्यक नर्स यांना देखील घरोघरी जाऊन कंडोम देण्यास सांगण्यात आलेले आहे. स्क्रिनिंग सर्वे करण्यासाठी आरोग्य कर्मचारी घरोघरी जाणार आहेत. त्यावेळी हे काम करण्यास सांगण्यात आले आहे.

बिहार राज्य हेल्थ सोसायटीचे सहकारी (BSHS) उत्पल दास यांनी सांगितले की, “लाखो लोक लॉकडाऊनमुळे घरी परतले आहेत. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत.” तर गोपालगंज येथील जिल्हा शल्यचिकित्सक टी.एन. सिंह म्हणाले की, “स्थलांतरीत मजुरांना कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन देण्यात आले आहे. गोपालगंज येथे २० हजार कंडोमची पाकिटे वाटण्यात आली आहेत. उरलेल्या ७ हजार कामगारांना घरी जाताना कंडोमची पाकीटे दिली जाणार आहेत.”

- Advertisement -

समस्तीपुर येथील जिल्हा शल्यचिकित्सक रती रमन झा यांनी सांगितले की, “स्थलांतरीत मजूर लाखोंच्या संख्येने इतर राज्यांमधून येत असल्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. आम्ही जिल्हा आणि तालुका स्तरावर क्वारंटाईन केलेल्या स्थलांतरीत मजुरांना कंडोमचे वाटप करत आहोत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -