घरक्राइममृत समजून वृद्धाला फ्रीजरमध्ये ठेवलं आणि २० तासानंतर मृतदेह जिवंत झाला

मृत समजून वृद्धाला फ्रीजरमध्ये ठेवलं आणि २० तासानंतर मृतदेह जिवंत झाला

Subscribe

बातमीचे शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटू शकतं. खरंय, प्रथमदर्शनी या शीर्षकामुळे तुमचा गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. पण ही खरी घटना आहे. ती कशी आणि कुठे घडली, हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो. तामिळनाडूमधील चेन्नईमध्ये हैराण करणारा हा किस्सा घडला आहे. एका वृद्धाला मृत समजून त्याच्या नातेवाईकांनी त्याचे शव फ्रीजर बॉक्समध्ये ठेवले. जेणेकरुन जवळचे नातेवाईक आल्यानंतर अंतिम दर्शन घेऊ शकतील. पण २० तासांनंतर जेव्हा फ्रीजर बॉक्स उघडण्यात आला, तेव्हा धक्काच बसला. कारण ज्यांना मृत समजून फ्रीजरमध्ये ठेवले ते वृद्ध आजोबा चक्क जिवंत होते.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना चेन्नईच्या कदमपट्टी भागात घडली. बालासुब्रमण्यम कुमार (७३) हे लहान भाऊ श्रवण (७०) सोबत राहत होते. सोमवारी श्रवणने फ्रीजर बॉक्स डिलीव्हरी करणाऱ्या दुकानातून फ्रीजर बॉक्स मागितला. त्याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता त्याच्या घरी बॉक्स पोहोचला. दोन दिवसांनी आम्ही बॉक्स न्यायला येऊ असे कंपनीने सांगितले होते. दोन दिवसांनी त्याप्रमाणे कंपनीचे लोक आले. मात्र त्यांना फ्रीजरमध्ये हालचाल होत असल्याचे दिसले.

- Advertisement -

कंपनीच्या लोकांनी निरखून पाहिल्यावर त्यांना दिसलं की, एक माणूस आतून हात दाखवत होता. त्या लोकांनी लगेचच बॉक्समध्ये असलेल्या बालसुब्रमण्यम कुमार यांना बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी लगेचच आयसीयूमध्ये भरती करत त्यांच्यावर उपचार सुरु केले. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे.

नक्की काय झालं होतं?

तर त्याचं झालं असं की, सोमवारी बालासुब्रमण्यम अचानक बेशूद्ध पडले. त्यामुळे श्रवणला वाटलं की त्यांचा मृत्यूच झाला. त्यामुळे त्यांनी फ्रीजर बॉक्स ऑर्डर करुन बालासुब्रमण्यम यांना त्यात टाकलं. तोपर्यंत त्यांनी घरातल्या तरुण लोकांना फोन करुन बोलावून घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र २० तास जिवंतपणीच बालासुब्रमण्यम यांना फ्रीजरमध्ये कुडकुडत काढावे लागले. नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रवण यांची मानसिक स्थिती ठिक नाही. त्यामुळे त्यांनी कसलाही विचार न करता बालासुब्रमण्यम यांना मृत समजून फ्रीजर बॉक्स मागवून घेतला आणि त्यांना त्यात भरले देखील. पोलिसांनी आता डॉक्टारांचा सल्ला घेऊन श्रवण यांची चौकशी करण्याचे ठरविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -