Corona Vaccine : चीनने दिले वर्षाअखेरीस लस आणण्याचे संकेत

covid 19 vaccine
कोरोना लसीचे प्रातिनिधिक छायाचित्र
Advertisement

कोरोना विषाणूचा फैलाव हा पहिल्यांदा चीनमधूनच झाल्याचा दावा जगभरातून करण्यात आला आहे. त्या चीनने आता या आजाराच्या संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. त्याचबरोबर चीनने आज, सोमवारी पेइचिंग ट्रेड फेअरमध्ये कोरोना विषाणूवरील पहिली लस जगासमोर सादर केली असून या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या वर्षाच्या अखेरीस ही लस बाजारात दाखल होऊ शकते, असे संकेत त्यांनी यावेळी दिले.

चीनच्या सिनोवेक बायोटेक आणि सिनोफॉर्म या कंपन्यानी मिळून ही लस तयार केली असून याबाबत माहिती देताना सिनोवेक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्या कंपनीने सुरुवातीपासूनच ही लस तयार करण्यासाठी एक फॅक्टरी तयार केली आहे. या फॅक्टरीत दरवर्षी लसीचे ३०० मिलियन डोस बनवण्याची क्षमता आहे. पेईचिंग ट्रेड फेअरमध्ये चीनने सोमवारी ही लस सादर केली, यावेळी चीनने तयार केलेली पहिलीच लस पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा –

वीजबिल कमी करा, नाहीतर लोकांच्या रोषाला सामोरे जा – राज ठाकरे