घरदेश-विदेश"काँग्रेसला भ्रष्टाचारासाठीच कमकुवत सरकार पाहिजे''

“काँग्रेसला भ्रष्टाचारासाठीच कमकुवत सरकार पाहिजे”

Subscribe

काँग्रेस पक्षाचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की काँग्रेसला विकासाचे वावडे आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आजवर त्यांनी विरोध केला आहे.

शनिवारी झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात मोदींनी देशातील मतदारांना उद्देशून भाषण केले. ‘काँग्रेसचा २००४ ते २०१४ हा दहा वर्षांचा कालखंड वाया गेला आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी कायम असते तर देशाचे भले झाले असते’, असे वक्तव्य मोदी यांनी यावेळी केले. ‘काँग्रेसची महाआघाडी ही वैचारिक विरोधाने भरलेली आणि दूरदृष्टी नसलेली आहे. मात्र भाजपला देशाचा विकास साधायचा आहे. मग, केंद्रात सरकार मजबूत हवे की गलितगात्र (मजबूर)? असा सवालही  मोदी यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, देशाचा प्रधान सेवक कसा हवा हे आता जनतेनेच ठरवावे. दोन-दोन महिने सुट्टीवर जाणारा, समजाता फूट पाडणारा, पैसे चोरून स्वत:च्या कुटुंबाचं भलं करणारा प्रधानसेवक हवा की, न थकता १८ तास दिवसरात्र काम करणारा, देशाला भ्रष्टाचारमुक्त करणारा, देशाचा आदर करणारा प्रधानसेवक हवा हे आता जनतेने ठरवायचे आहे. थोडक्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी पर्याय असू शकत नाहीत, असा प्रत्यक्ष मुद्दा नरेंद्र मोदी यांनी यावेळी मांडला.

काँग्रेसला विकासाचे वावडे

काँग्रेस पक्षाचा समाचार घेताना मोदी म्हणाले, की काँग्रेसला विकासाचे वावडे आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आजवर त्यांनी विरोध केला आहे. काँग्रेसने अन्य मागासवर्गाच्या आयोगाला नागरिकत्व विधेयकाला, तिहेरी तलाक विधेयकाला देखील विरोध केला. मतांच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. देशाच्या अन्नदात्याला काँग्रेसने एका मतदात्याइतकीच किंमत दिली. मात्र, भाजपाने शेतकऱ्यांचा दीर्घकालीन फायदा करुन देणाऱ्या अनेक योजना राबवल्या आहेत. कठीण आणि अशक्य वाटणारी पण शेतकऱ्यांच्या हितीची अशी अनेक धोरणं आम्ही राबवली आहेत.

- Advertisement -

‘राफेल’च्या मुद्द्यावरुनही मोदींनी यावेळी काँग्रेसवर निशाणा साधला. राफेलमध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा नसल्याचे वेळोवेळी सांगूनही काँग्रेसने झोपेचं सोंग घेतल्याचं मोदी यावेळी म्हणाले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अशा देशविरोधी काँग्रेसला निवडून देण्याऐवजी जनतेने विकास शक्तीवर भर देणाऱ्या, सैनिकांचा गौरव करणाऱ्या आणि नवा भारत घडवणाऱ्या मोदी सरकारलाच निवडून द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.

याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आलोक वर्मा, सीबीआय, अयोध्या राममंदिर प्रकरण तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारख्या प्रकरणावरही मत मांडले. भाजप डॉ. आंबेडकर यांना आणि त्यांच्या तन्वांना मानतो, त्यांचा आदर करतो. तसंच राज्यघटनेचाही आम्ही करतो आणि सर्व कायदे मानतो, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.


वाचा : ‘राग आणीबाणी’…राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून वर्तवले भाकीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -