घरताज्या घडामोडीCorona: कोरोनावरील वॅक्सिन जादूच्या कांडीप्रमाणे काम करणार नाही - WHO

Corona: कोरोनावरील वॅक्सिन जादूच्या कांडीप्रमाणे काम करणार नाही – WHO

Subscribe

'कोरोना विषाणूवर लस आली तरी ती लस जादूच्या कांडीप्रमाणे काम करणार नाही', असा दावा 'डब्लूएचओ'ने केला आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वच देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत असून अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. या विषाणूवर औषध काढण्याचे सर्वच देशात प्रयत्न सुरु असून काही महिन्यात या कोरोना विषाणूवर वॅक्सिन येण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक इशारा दिला आहे. त्यांच्या म्हण्यानुसार, ‘जगभरात अनेक ठिकाणी बऱ्याच कोरोना लसनिर्मिती फेज-३ मध्ये असून क्लिनिकल चाचणी सुरू आहेत. यामुळे लोकांमध्ये कोरोनापासून वाचवण्यासाठीची आशा निर्माण झाली आहे. पण, सध्या तरी कोरोनाची लस जादूच्या कांडीसारखं काम करणार नाही आणि कदाचित कधीच नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस दिला आहे.

अमेरिकेच्या वैज्ञानिक म्हणतात…

अमेरिकेच्या संक्रमक रोग तज्ञ डॉ. अ‍ॅथोनी स्टीफन फॉसीचे वरिष्ठ सल्लागार डेविड मारेंसचे म्हणणे आहे की, ‘वॅक्सिन बनवणे हे एका आंधळ्या परिक्षणाप्रमाणे आहे. ज्यामध्ये सुरुवातीला चांगले परिणाम दिसून येतात. परंतु, याची कोणतीही हमी देऊ शकत नाही की, शेवटच्या टप्प्यात देखील ही लस यशस्वी ठरेल. आम्ही अशी आशा करतो की, पहिल्याच टप्प्यात आम्ही यशस्वी लस तयार करु आणि ६ ते १२ महिन्यात एक यशस्वी लस तयार करु’.

- Advertisement -

जगभरात कोरोनाचे संकट असताना लस बनवण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. विविधा देशांमध्ये कोरोना विषाणूविरोधात लस तयार केली जात असून त्यांच्या चाचण्या होत आहेत. नुकतेच रूसनेही त्यांनी बनवलेल्या लसीची चाचणी पूर्ण झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच ही लस १० ऑगस्टपर्यंत येऊ शकते, अशी माहिती त्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी दिल्याचे समजते. ही लस दि गामालेया इंस्टिट्युटने बनवली आहे. त्या शिवाय आणखी दोन कंपन्यांनी क्लिनिकल ट्रायल करण्याची परवानगी दिली आहे. याच इंस्टिट्युटने १० ऑगस्टपर्यंत ही लस बाजार येऊ शकते असा दावा केला आहे.


हेही वाचा – Corona Vaccine : दिलासा! रूसची वॅक्सीन १० ऑगस्टपर्यंत येऊ शकते


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -